रबर कंपनीच्या गोदामाची भिंत कोसळून पालघर जिल्ह्यात तीन कामगारांचा मृत्यू, पोलिस तपास चालू…
पालघर: पालघर जिल्ह्यात वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विक्रमगड रोड येथे असलेल्या टीना रबर कंपनीच्या गोदामाची भिंत अचानक कोसळून, त्याखाली गाडले गेल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सुटीच्या काळात अनेक कामगार जवळच नाश्ता करत बसले होते. भिंतीपासून जवळच बसलेले तीन कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अपघाताची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव […]
अधिक वाचा...भेटलाच नाही, तर स्पष्टीकरण कशासाठी? दिशा सालियान प्रकरणी सूरज पांचोलीच्या स्पष्टीकरणावर नेटकऱ्यांची टीका…
मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नाव समोर आल्यापासून अभिनेता सूरज पांचोलीने पहिल्यांदाच सविस्तरपणे आपले मत मांडले आहे. या प्रकरणात नाव जोडले गेल्यापासून आपल्याला सोशल मीडियावर सतत शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा त्याने केला आहे. दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन आणि शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांना आपण कधीही भेटलो नव्हतो, असा दावा […]
अधिक वाचा...साहिल वाकोडेच्या आई-वडिलांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू; जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी…
मुंबई: आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूबाबत प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी त्याच्या आई-वडिलांनी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. साहिल वाकोडे हा आयआयटी मुंबईमध्ये बी.टेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. १८ सप्टेंबर रोजी, मध्य-सत्र परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरल्याच्या आरोपावरून त्याची […]
अधिक वाचा...पर्यवेक्षिका मनीषा झा ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल मोजताना झाली कॅमेऱ्यात कैद…
निवारीः मध्य प्रदेशच्या निवारी जिल्ह्यातील वन स्टॉप सेंटरच्या प्रभारी प्रशासक मनीषा झा यांचा नोटा मोजतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागात खळबळ उडाली आणि अंगणवाडी सेविका भरतीमधील भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले. व्हीडिओ समोर आल्यानंतर, विभाग आणि प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करण्याबाबत चर्चा केली आहे. मनीषा झा यांच्याशी […]
अधिक वाचा...लातूरमध्ये भोंदूबाबचे कांड; आई-वडीलांना बसवलं घराबाहेर अन् आतमध्ये शारीरिक संबंध…
लातूर: एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक लातूर शहरात उघडकीस आली आहे. तुझ्या पत्रिकेत कुंडली दोष आहे आणि तो दूर करण्यासाठी घरातील पूजा करावी लागेल, असा बनाव रचून एका भोंदू बाबाने (वय ४०) अल्पवयीन मुलीवर (वय १७) अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला […]
अधिक वाचा...ठाणे शहरात दारुड्या गावगुंडाने गस्तीदरम्यान केली पोलिस अधिकाऱ्याची हत्या…
ठाणे: ठाणे शहरात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना गस्त घालणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची गावगुंडाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस उपनिरीक्षक (PSI) किसन भोईर असे हत्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी राजू वाल्मिकी याला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस उपनिरीक्षक किसन […]
अधिक वाचा...सामाजिक वनीकरणातील गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करा; वडूज न्यायालयाचा आदेश…
कराड: सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत झालेल्या कथित ११ कोटी २१ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सामाजिक वनीकरण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण २३ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश वडूज न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाची वडूज पोलीस प्रभावीपणे अंमलबजावणी करणार का, याकडे तक्रारदारांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे. सन २०१७ ते २०२३ या कालावधीत […]
अधिक वाचा...भाडे आकारणीवरून रिक्षाचालकाकडून आरटीओ अधिकाऱ्यावर हल्ला; साथीदारांच्या मदतीने केली बेदम मारहाण…
नवी मुंबई: मीटरप्रमाणे भाडे आकारण्याच्या वादातून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) सहायक मोटार वाहन निरीक्षक तुषार कदम, यांच्यावर रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याची गंभीर घटना नेरूळमधील एल. पी. जंक्शन परिसरात घडली आहे. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी रिक्षाचालकासह पाच जणांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबई उपप्रादेशिक […]
अधिक वाचा...पुणे शहरातील 11 पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल; पाहा नावे…
पुणे : आंबेगाव पठार पोलिस चौकीत आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवून बेदम मारहाण केल्याप्रकरणी अखेर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या फॅक्ट फाईंडिंग रिपोर्टनंतर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 11 पोलिस अधिकारी आणि अंमलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात अल्पवयीन मुलांना मारहाण प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात 11 पोलिसांवर FIR […]
अधिक वाचा...रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव लाचखोरीच्या जाळ्यात…
अलिबाग: तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी एक लाख ५० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रायगड पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २३ सप्टेंबर रोजी करण्यात आल्याचे वृत्त आहे. भस्मे हे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात वित्त लेखा सहाय्यक म्हणून […]
अधिक वाचा...
