हृदयद्रावक! चिमुकल्याला पाठीवर घेऊन आई धावत सुटली पण नको ते घडलं…
पुणे: आंबेगाव तालुक्यातील खेतेपठार येथे एका चिमुकल्याला रस्त्याअभावी आपला जीव गमवावा लागला आहे. आदित्य विकास घनकुटे (वय २) असे या चिमुकल्याचे नाव असून, त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी काळाने ही झडप घातल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आदित्यला सोमवारी सकाळी जेवताना अचानक ठसका लागून तो बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेणे गरजेचे […]
अधिक वाचा...पोलिसानं आयुष्य संपवलं; सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा…
मुंबई: प्रेयसीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या मानसिक त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून पोलिस शिपायानं आपलं जीवन संपवलं आहे. “जीव दे, नाहीतर तुझी नोकरी घालवू,” अशा शब्दांत प्रेयसीच्या आई-वडिलांनी धमकी दिल्यामुळे या पोलिसानं टोकाचं पाऊल उचलले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहे. भैयासाब भीमराव व्हावळे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे […]
अधिक वाचा...पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताला रंगेहात पडकले, थेट बेड्या…
मुंबई : खार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार काळे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून, अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका प्रॉपर्टी प्रकरणात चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तुषार काळे याने 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी संबंधिताकडे केली होती. त्यानुसार, ठरवल्याप्रमाणे तुषार काळे यास दीड […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…
पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथे युवकाची लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी (ता. १६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील […]
अधिक वाचा...नाशिक! गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात मोठी कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिक : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरच्या काळाबाजाराविरोधात पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने सातपूर […]
अधिक वाचा...मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…
पाणीपत (हरियाणा): होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून रेल्वे गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या खुनाचा छडा लावला आहे. […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या थोबाडीत मारणाऱ्या पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू…
पुणे : नगरच्या जामखेड शहरात पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी जमखमीला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले होते. सागर मोहोळकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जामखेडमध्ये 9 मार्च रोजी पैलवान सागर मोहोळकरवर गोळीबार झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी एकाला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपी पुण्याचा रहिवासी आहे. हल्लेखोराने […]
अधिक वाचा...बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तिका प्रकरणात नवा ट्विस्ट…
सोलापूर : बीड जिल्ह्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी नर्तिकेच्या नादापायी आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. आता त्याच कला केंद्राविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे पोलिस स्टेशनच्या अवघ्या काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या ‘स्वरांजली कला केंद्र’ या नावाखाली चालणाऱ्या भयानक सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. टेंभुर्णी […]
अधिक वाचा...गुप्तधनाच्या नावाने जेसीबीने खणला खड्डा अन् प्राध्यापकाला पुरलं; पोलिसांनी केला गुन्हा उघड…
छत्रपती संभाजीनगर: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे यांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत प्राध्यापक राजाराम उत्तम लोंढे असे असून ते शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. आरोपींनी प्राध्यापकाचा खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी चित्रपटासारखा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राठोड, आकाश पवार आणि […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…
पुणे : बारामती तालुक्यातील शारदानगर येथून सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह माळेगाव खुर्द-केव्हीके रस्त्यालगतच्या एका विहिरीत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा दत्तात्रेय मेमाणे (वय २१) असे या मृत युवतीचे नाव आहे. या घटनेमुळे मेमाणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रतीक्षा ही शिक्षण घेत होती. ९ मार्च रोजी सकाळी ती घरातून बाहेर पडली […]
अधिक वाचा...
