नाशिकमध्ये दारू पिताना मित्राला दगडानं ठेचून मारलं; मानवी कवट्या अन् हाडं…

नाशिक : म्हसरुळ पोलिस ठाणे हद्दीत असेलल्या मेरी रासबिहारी लिंकरोडवर औदुंबर लॉन्सच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसलेल्या युवकांमध्ये वाद झाला आणि या वादानंतर रिक्षा चालक युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. प्रशांत तोडकर (वय 28, रा. रामवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे.

प्रशांत हा नाशिकच्या सीबीएस ते म्हसरूळ या मार्गावर रिक्षा चालवत होता. रात्रीच्या वेळी प्रशांत आणि इतर मित्रांसोबत झालेल्या वादात प्रशांच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे तपास पथक आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात पोलिसांचा तपास सुरू आहे. नेमकी ही घटना कशी झाली आणि खून नेमका कोणी केला या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत पंचवटीमध्ये एका पोत्यात मानवी कवट्या आणि हाडे सापडल्याने एकच खळबळ उडाली. एरंडवाडीमध्ये मंदिर परिसरात भरवस्तीत पोत्यामध्ये मानवी हाडे आणि कवट्या असल्याची बातमी समजल्यानंतर पंचवटी पोलिस त्या ठिकाणी तातडीने पोहोचले. पोलिसांनी मानवी हाडे आणि कवट्या असलेले पोतं ताब्यात घेतले. पंचवटी पोलिसांनी याचा सखोल तपास करत ही मानवी हाडे आणि कवट्या प्लास्टिकच्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…

धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकाच वेळी घेतला जगाचा निरोप…

नाशिक पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…

नाशिक शहर पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने भुसावळमधील दुहेरी हत्याकांडातील आरोपीला ठोकल्या बेड्या…

नाशिकमध्ये माजी नगरसेविकेच्या पतीसह दोघांवर जीवघेणा हल्ला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!