
नाशिक! लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे 250 अश्लील Video व्हायरल…
नाशिक : लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे सुमारे २५० व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. मागील जवळपास दीड वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे यामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी हे व्हिडीओ प्रसारित करणाऱ्या २३ टिपलाईन आयडीधारक, प्रोफाइलधारक आणि संबंधित मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अलर्टच्या आधारे नाशिक सायबर पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांची सखोल छाननी करून ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर २०२४ ते २७ जुलै २०२६ या सुमारे दीड ते पावणेदोन वर्षांच्या कालावधीत संशयितांनी लहान बालकांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल केले होते. आंतरराष्ट्रीय सायबर टिपलाईन आणि नाशिक शहरातून लोकटेक्ट झालेल्या आयपी ॲड्रेसवरून सुमारे २५० हे व्हिडिओ अपलोड झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, या २३ जणांविरुद्ध कायदेशीर गुन्हे नोंदविण्यात आले असून आता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हेगारांचा कसून शोध घेतला जात आहे.
View this post on Instagram
संशयितांनी हे व्हिडिओ विकृत मानसिकता ठेवून शेअर केले, की यामागे लहान मुलांच्या तस्करीचे मोठे रॅकेट कार्यरत होते, याचा सखोल तपास सायबर सेलकडून सुरू आहे. तसेच, सोशल मीडियाच्या बनावट प्रोफाईल्सद्वारे पालकांना किंवा अल्पवयीन मुलांना ब्लॅकमेल करण्याचा आरोपींचा डाव होता का? याचाही तपास सध्या फॉरेन्सिक टीमकडून सुरू आहे.
दरम्यान, व्हिडिओ सोशल मीडिया ग्रुपवर आल्यास ते ताबडतोब सायबर हेल्पलाइन १९३० वर कळवावेत. असे व्हिडिओ फॉरवर्ड करणे किंवा आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवणे हा देखील अजामीनपात्र गुन्हा आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
नाशिक हादरलं! युवती आजारी असतानाही दोघांकडून लैंगिक अत्याचार…
नाशिकच्या दीपाली पवार मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट…
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन; कारण आलं पुढं…
नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…

