फेसबुकवरील महिलेच्या मैत्रीमुळे गेला अधिकाऱ्याचा जीव…

नाशिक: फेसबुकवर ओळख झालेल्या एका महिलेनं एका कृषी अधिकाऱ्याला तब्बल ५५ लाखांचा गंडा घातला आहे. संबंधित अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!

प्रशांत पाटील असे आत्महत्या करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रशांत पाटील हे पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सध्या ते नाशिकमधील अंबड येथे राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकवरील एका महिलेने प्रशांत पाटील यांना कमी किमतीत तेल खरेदी करून ते जास्त किमतीत विकून मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून पाटील यांनी ३० तोळे सोन्याचे दागिने विकले, तसेच कर्ज काढून ५५ लाख रुपये त्या महिलेला दिले होते. मात्र, त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

प्रशांत पाटील यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, सायबर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक करणाऱ्या या महिलेचा शोध सायबर पोलिस घेत आहेत.

IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…

Digital Arrest! IPS विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; कोटींचा गंडा…

पुणे! फेक प्रोफाईल तयार करून महिलेला कोट्यावधी रुपयांना फसवलं…

लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…

Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…

पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

Cyber Crime! ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणारे ताब्यात…

पुणे शहरात बनावट नोटा छापणा-या टोळीचा सायबर पथकाकडून पर्दाफाश…

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!