पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : एका महिलेने आपल्या पाळीव कुत्र्यास उपचारासाठी पेट क्लिनिकमध्ये आणले होते. उपचार करताना कुत्र्याचा मृत्यू झाल्यामुळे महिलेने डॉक्टरासह चार जणांविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. पाषण भागात ही घटना घडली आहे.

एक 35 वर्षीय महिलाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ती तिच्या कुत्र्याला लस देण्यासाठी पाषणामधील विगल्स माय पेट क्लीनिकमध्ये आली होती. क्लीनीकमध्ये त्या महिलेने लस देण्यासाठी कुत्र्यास डॉक्टराकडे दिले. यावेळी डॉ. शुभम राजपूत (वय 35) यांनी क्लीनीकमधील दोघांच्या मदतीने पट्टाने झाडाला बांधला. परंतु, त्या पट्यामुळे त्या कुत्र्यास फाशी लागली. घटनेच्या पंधरा मिनिटानंतर डॉक्टरांच्या सहायकांनी त्या कुत्र्याचा मृत्यू झाल्याची माहिती महिलेला दिली.

घटनेनंतर डॉ. संजीव राजाध्यक्ष आणि डॉ. शुभम राजपूत यांनी महिलेला काही माहिती दिली नाही. ते रुग्णालयातून फरार झाले. यामुळे महिलेने चतुश्रृंगी पुलिस स्टेशन गाठत तक्रार दिली. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मृत्यू झालेला कुत्रा हा 40 दिवसांचा असतानापासून आपण त्याला पाळत होतो. आता तो 12 वर्षांचा होता, असे त्या महिलेने सांगितले. हनी नावाचा हा कुत्रा लैब्राडोर जातीचा होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कुत्रा सतत भुंकत असल्याने त्याच्या गुप्तांगात रॉड घुसवला अन् पुढे…

दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

क्रूरता! कुत्र्याला बेदम मारहाण करत दिली फाशी…

संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!