
नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…
नाशिकः गुंडा विरोधी पथकाने उपनगर पोलिस ठाणे येथील गोळीबारातील गुन्हेगारी गँगचा शूटर व मोक्का मधील फरार आरोपी ‘बारक्या’ ला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत.
उपनगर पोलिस ठाणे हद्दीत 02/02/2024 रोजी फिर्यादी बरखा उज्जेनवाल याच्यावर फर्नांडीसवाडी, नाशिकरोड परिसरात आरोपी मयूर बेद गँग चे टोळी प्रमुख मयूर बेद, संजय बेद, टक्कू उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकूडे इर्षाद चौधरी, दीपक चाट्या व गौरव गांडले यांनी फिर्यादी याचा मुलगा राहुल उज्जेनवाल याची माहिती विचारून शिवीगाळ करून फिर्यादी याच्यावर जीवेठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टोल राखून 2 गोळ्या फायर केल्या होत्या. फिर्यादी बचावल्या व त्याचवेळी आवाज एकूण लोकांची गर्दी होऊ लागल्याने आरोपी तेथून पळून गेले म्हणून उपनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर 35/2024भादवि 307,143,147,149,504,506, 120(ब ), भा ह का 3/25,4/25 प्रमाणे दाखल होता. सदर गुन्हाचे गांभीर्य पाहून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हाला मोक्का (MCOC) लावून आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून कारवाई केली. परंतु, गुन्हातील आरोपी शुटर बारक्या उर्फ श्रीकांत वाकूडे गुन्हा दाखल झाल्या पासून फरार होता. फरार असूनही तो फिर्यादी व परिसरातील लोकांना मारण्याची धमकी देत असे व आपली ओळख लपवून नाशिक ला येऊन लोकांना दहशत निर्माण करून लगेच पळून जायचा. या दरम्यान नाशिकरोड येथील संजय उज्जेनवाल यांना 05/03/2024 रोजी रात्री फर्नाडदिस वाडी, जयभावणी रोड, नाशिक येथे आरोपी मोटारसायकल वर येऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी गावठी कट्टा धरून मारण्याची धमकी दिली म्हणून उपनगर पोलिस ठाणे येथे गु र क्र 86/2024 भादवी कलम 506,34 भारतीय हत्यार कायदा 3/25प्रमाणे गुन्हा नोद होता.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
सदर आरोपीचे गुन्हेगारी कृत्य पाहून आरोपीस तात्काळ अटक करणे बाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व पोलिस उप आयुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव यांनी गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना आदेशीत केले की सदरचा आरोपीची माहिती काढून तात्काळ अटक करणे बाबत टास्क दिले होते.
मोक्का सारख्या गंभीर गुन्हातील गुन्हेगार आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकूडे हा कायम राज्य गोवा, उज्जैन, गुजरात या राज्यात फिरत असल्याने त्याचा ठावठिकाना लागत नव्हता. परंतु, 28/4/24 रोजी गुंडा विरोधी पथकाचे पो हवा 1033/विजय सूर्यवंशी व पो ना/1668 प्रदीप ठाकरे यांना आरोपीची नाशिक मधील मैत्रीणची माहिती मिळाली असता तिच्याकडून माहिती मिळाली की गुन्हातील आरोपी हा सध्या पुणे येथील हडपसर किंवा लोणीकंद परिसरात असू शकतो. सदरची माहिती गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांनी तात्काळ प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे ) यांना दिली असता वरिष्ठ अधिकारी यांनी गुंडा पथकास तात्काळ पुणे येथे रवाना होणे बाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या. सदरचा आरोपी हा कोणत्याही परिस्थितीत अटक झाला पाहिजे असे सांगितले. त्यानुसार गुंडा विरोधी पथक चे प्रभारी सहा. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते त्याचे सोबत पो हवा विजय सूर्यवंशी, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत व प्रवीण चव्हाण असे पथक पुणे येथे रवाना झाले. पोलिस पथक हडपसर, पुणे परिसरात जाऊन त्यांनी पूर्ण रात्र व दिवस आपली ओळख कोणालाही न सांगता वेशांतर व पूर्ण पेहराव बदलून स्थानिक लोक व स्थानिक गुन्हेगार यांना भेटून आरोपी बाबत चौकशी केली. आरोपी हा कधी कधी हडपसर, पुणे या परिसरात दिसला, परंतु सध्या कोठे आहे याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
गुंडा विरोधी पथकाचे पोलिस पथक येथेच खचून न जाता त्यानंतर ते लोणीकंद, पुणे या परिसरात पोहचले. त्यांनी त्या परिसरातही पूर्ण पेहराव बदलून वेशांतर करून चौकशी केली असता आरोपी हा दारू पिण्यासाठी व रात्री फिरण्यासाठी कधी कधी लोणीकंद या परिसरात येत असतो, अशी माहिती पोलिस पथक यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथक यांनी हॉटेल परिसर कटकेवाडी, लोणीकंद येथे 29/4/24 रोजी रात्री सापळा लावला. आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत वाकूडे पोलिस पथकाला दिसला पण आरोपीने ही पोलिसांना पाहिले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु गुंडा पोलिस पथक यांनी सिनेस्टाईल आरोपीचा पाठलाग करून आरोपी बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकूडे (वय 34 वर्षे रा. नाशिक) यास पकडून बेड्या ठोकल्या. गुंडा विरोधी पथक यांनी आरोपीला पुण्यावरून नाशिक येथे आणून पुढील तपास कामी उपनगर पोलिस ठाणे च्या ताब्यात दिले.
या कामगिरी मुळे गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी व अंमलदार याचे नाशिक मधील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच नाशिककर नागरिकांनी ही गुंडा विरोधी पथक हे गुन्हेगार याचेवर नजर ठेऊन त्याचे कर्दनकाळ ठरल्याने व गुन्हेगार हे गुन्हा करून बाहेर राज्यात पळून जातात. पोलिसासमोर पकडण्याचे आव्हान निर्माण करतात. परंतु, गुंडा विरोधी पथक गुन्हेगार यांना पकडून आणते व जनतेला न्याय देते म्हणून नागरिकांनी ही पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व गुंडा विरोधी पथकाचे अभिनंदन केले आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन खाली गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते, पोलिस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, डी के पवार, सुनील आडके, राजेश सावकार, निवृत्ती माळी व सुवर्णा गायकवाड यांनी केली आहे.
नाशिक पोलिसांनी कोट्यावधींचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत…
नाशिकमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने लावला अपहृत मुलीचा शोध…
नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ची धडाकेबाज कामगिरी; लाखो रुपयांचा गुटखा जप्त…
नाशिक पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह एकाला केली अटक…
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

