अहमदनगर हादरले! महिला आणि चिमुकल्याच्या अंगावर कार घालून हत्या…

अहमदनगर: घराच्या जागेवरुन सुरु असलेला वादातून आरोपीने महिला आणि तिच्या अडीच वर्षांच्या मुलाच्या अंगावर कार घालून दोघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २३) सायंकाळी पारनेरमध्ये घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेची सासू चंद्रकला येनारे यांनी फिर्याद केली आहे. पोलिसांनी किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी सध्या फरार आहे. शितल येनारे आणि स्वराज येनारे हे अहमदनरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये राहत होते. हल्लेखोर आरोपी श्रीमंदिलकर हा त्यांच्या घराशेजारी राहत होता. घरा शेजारच्या जागेच्या मोजणीतून दोन्ही कुटुंबात वाद होता आणि त्यातूनच ही घटना घडली असल्याचा आरोप येणारे कुटुंबियाने केला आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. श्रीमंदिलकर आणि येनारे हे कुटुंब शेजारी शेजारी राहत होते. अनेक दिवसापासून जागेवरुन धुसफूस सुरूच होती. यातून अनेकदा वादावादीही झाली. श्रीमंदिलकर याने भरधाव कार अंगावर घातल्याने महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील बोगस डॉक्‍टरवर गुन्हे दाखल करा…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

अहमदनगर जिल्हा हादरला! पतीला झोपेच्या गोळ्या खावू घातल्या अन् पुढे…

अहमदनगर जिल्हा हादरला! जावयाने पत्नी, मेहुणा, आजे सासूची केली हत्या…

अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!