
अभिनेत्रीच्या अपघाती मृत्यूनंतर अभिनेत्याची आत्महत्या…
चेन्नई (तमिळनाडू): प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री पवित्रा जयराम हिच्या अपघाती मृत्यूनंतर तिचा सहकलाकार आणि मित्र अभिनेता चंद्रकांत याने आत्महत्या केली आहे. एका आठवडयातच दोघांचा मृत्यू झाल्यामुळे तेलगू चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
तेलुगू अभिनेता चंद्रकांत हा चंदू नावाने प्रसिद्ध होता. त्याच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चंद्रकांत याचा तेलंगणातील अलकापूर येथील घरी मृतादेह आढळून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात होता, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. आंध्र प्रदेशातील मेहबूब नगर येथे 12 मे 2024 रोजी मोटार अपघातात अभिनेत्री पवित्रा हिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्युनंतर चंद्रकांतला धक्का बसला होता. त्यानंतर आता त्यानं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू…
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ…
‘कुमकुम भाग्य’फेम अभिनेत्रीनेही घेतला जगाचा निरोप…
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

