
हृदयद्रावक! आईने पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं चिमुकल्याला…
ठाणे: एका महिलेनं सासूसोबतच्या वादातून पोटच्या मुलाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. महिलेनं गुन्ह्याची कबुली दिली असून सासूच मुलावर जास्त हक्क दाखवते, या रागातून हत्या केल्याचे सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आरोपी महिलेचा (वय २३) दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ती आपला एक वर्षांचा मुलगा आणि पतीसह सासू-सासऱ्यांसोबत भिवंडीतील कासणे गावात राहात आहे. आरोपी महिलेचा पती एका गोदामात काम करतो. मुलगा हा जन्मापासूनच सतत आजारी असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. शिवाय, मुलावर सासूच जास्त हक्क दाखवते, या कारणातून महिलेने आपल्या मुलाचा जीव घेतला आहे.
आरोपी महिलेचे सासू सासरे मुलाला घेऊन टिटवाळा येथे मुलीच्या घरी जात होते. पण सध्या थंडीचे दिवस असल्याने सतत आजारी असणाऱ्या मुलाला बाहेर घेऊन जाऊ नये, असे सुनेचे म्हणणे होते. यावरून सासू-सुनेमध्ये वाद झाला. या वादानंतरही सासू सासरे नातवाला घेऊन टिटवाळा येथे गेले. पण सायंकाळी परत आल्यानंतर मुलाला ताप आला होता. यावरुन पुन्हा सासू-सुनेमध्ये भांडण झाले. यावेळी गोदामात काम करणाऱ्या पतीनं मंगळावारी सायंकाळी आपल्या पत्नीची समजूत घालून कामावर निघून गेला.
दुसऱ्या दिवशी पहाटे कामावरून घरी आल्यानंतर पती घरात झोपला होता. यावेळी पत्नीने नवऱ्याला उठवून मुलगा सापडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी मुलाची शोधाशोध सुरू केली. पण त्याचा तपास लागत नव्हता. एक वर्षांचा मुलगा स्वत:हून बाहेर जाणार नाही, त्यामुळे त्याला कुणी उचलून नेलं का? अशी शंकाही कुटुंबीयांना आली. पण काही वेळाने घराच्या वरच्या मजल्यावरील टाकीत मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास केला. यावेळी जन्मदाती आईनेच मुलाची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…
धक्कादायक! आईने घरात घेतला गळफास तर दोन चिमुकली आढळली पाण्याच्या बॅरेलमध्ये…
हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…
हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…
हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…

