कॅम्प परिसरातील शाळेत विद्यार्थ्याचे शारिरीक अत्याचार

पुणे : लष्कर परिसरातील एका प्रसिद्ध कॉन्व्हेंट शाळेत मे 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान ही घटना घडली. शाळेच्या वॉशरूममध्ये एका मुलावर दुसऱ्या विद्यार्थ्याने शारीरिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. लष्कर परिसरातील एका प्रसिद्ध कॉन्व्हेंट शाळेत मे 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि आरोपी एकाच शाळेत शिकतात. मे महिन्यात पीडित मुलगी शाळेच्या शौचालयात गेली होती. त्यावेळी आरोपीने त्याला धमकावून कपडे काढण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपीने मुलाचे शारीरिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने वेळोवेळी मुलाला धमकावले व शिवीगाळ केली. हा प्रकार असह्य झाल्यानंतर पीडितेने आई-वडिलांना व शिक्षकांना याची माहिती दिली.

शाळेने हस्तक्षेप करत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी शाळेला भेट देऊन मुलाचे सांत्वन केले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिवानंद जाधव करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!