
हृदयद्रावक! महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह घेतली विहिरीत उडी…
बेळगाव (कर्नाटक): बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली. यामध्ये तिघांचाही मृत्यू झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यल्लावा करीहोळ (वय 30) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. तर सात्विक (वय 5) आणि मुतप्पा (वय 1 वर्षे) असे विहिरीत उडी घेतल्याने मृत्युमुखी पडलेल्या दोन चिमुकल्यांची नाव आहेत.
यल्लावा करीहोळ या महिलेचा तिच्या पतीसोबत वारंवार वाद होत होता. त्यामुळे यल्लावा करीहोळ ही महिला नैराश्यात गेली होती. रविवारी (ता. २९) तिने टोकाचा निर्णय घेत दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. आपल्या मुलीने चिमुकल्यांसह आयुष्य संपवल्याने माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढले आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
दरम्यान, महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. चिमुल्यांचे मृतदेह पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात पत्नीच्या विरहाने पतीने घेतला जगाचा निरोप; सात महिन्यांची चिमुकली पोरकी…
हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…
हृदयद्रावक! गर्भवती असल्याची गुडन्यूज मिळाली अन् नको ते घडलं…
हृदयद्रावक! शिक्षिकेने उदार मनाने आपल्या यकृताचा काही भाग केला दान अन्…
हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…

