
स्वारगेट पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मोटारींच्या काचा फोडून लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.
स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ४४१ / २०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२), ३२४ ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल असून, दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची फॉरच्युनर गाडी एम एच १२ एफ. पी. ९९९३ हि रोडचे कडेला लॉक व पार्क करुन ठेवली होती. मोटारीची काच फोडुन गाडीचे नुकसान करुन फिर्यादी यांचे मालकीचा १,००,०००/- रु. कि.चा लॅपटॉप, एअर पॉड असलेली बॅग चोरून नेली होती. याबाबत त्यांनी तक्रार दिल्याने नमुद गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोउपनिरी रविंद्र कस्पटे व पोलिस अंमलदार यांचे मदतीने गुन्हयातील लॅपटॉपचा शोध घेतला असता सदरचा लॅपटॉपचे लोकेशन बेंगलोर याठिकाणाचे आले. बेंगलोर पोलिस यांना संपर्क करुन नमुद व्यक्तीस ताब्यात घेण्यास सांगितल्याने त्यांनी त्यास ताब्यात घेतले होते. त्यावरुन लागलीच वपोनि युवराज नांद्रे यांनी वरिष्ठांची परवानगी घेवुन तपास पथकातील सपोनि चांगदेव सजगणे, पोलिस अंमलदार फिरोज शेख व सुजय पवार यांना बेंगलोर येथे रवाना केले होते.
सदर पथकाने बेंगलोर येथे जावून सुरेश कुमार पांडुरंगन सेरवई (वय ५० वर्षे रा. रामजीनगर पुंगनुर ता. श्रिरंगम जि. त्रिचापल्ली तामिळनाडू) यास सदर ठिकाणाहुन दोन लॅपटॉप सह पुढील तपासकामी ताब्यात घेवुन स्वारगेट पोलिस स्टेशन येथे घेवून आले. सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करुन पोलिस कोठडी दरम्यान त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे ०२ साथीदारांसह मिळून पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एकूण ११ वाहनांच्या काचा फोडुन ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दाखल गुन्हयातील एकुण १,५०,०००/- रु. किं.चा अॅपल कंपनीचा व डेल कंपनीचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. सदर तपासादरम्यान निष्पन्न झालेले गुन्हे पुढीलप्रमाणे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे प्रविणकुमार पाटील पोलिस उप-आयुक्त, परि २ पुणे स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज नांद्रे यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा. पोलिस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलिस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलिस अंमलदार भांदुर्गे, तनपुरे, मोराळे, लाहीगुडे, घुले, शेख, पवार, चव्हाण, खेंदाड, टोणपे, शिंदे व दुधे यांनी केली आहे.
पुणे शहरातील फरासखाना पोलिसांनी आरोपींना पाठलाग करून केली अटक; पाहा गुन्ह्याची पद्धत…
पुणे शहरात खोक्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली; कारण समोर…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात पुन्हा हिट ऍण्ड रन, ऑडी कार चालकाने युवकाला चिरडले…
पुणे शहरातील बंडगार्डन पोलिसांनी केले लाखो रुपये किंमतीचे मोबाईल हस्तगत…

