सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख एक धाडसी अधिकारी…

दिड वर्षात जवळपास 18 कोटींचा मुद्देमाल जप्त: वेगवेगळ्या गुन्ह्यात 4387 आरोपींना अटक

सातारा (उदय आठल्ये): 20 ऑक्टोबर 2022 मध्ये समीर शेख यांनी सातारा जिल्हा पोलिस दलाचा पदभार ‌स्वीकारल्यानंतर आज अखेर आपल्या कर्तृत्वाचा आलेख चढता ठेवला आहे. गेल्या दीड वर्षात सातारा जिल्हा पोलिस दलाकडून जिल्ह्यातील विविध भागात सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई करुन तसेच दरोडा घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सुमारे जवळपास 18 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यात 4387 आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये दरोडा, घरफोडी, जबरी चोरी ,रेतीचोरी, गुटखा, दारुबंदी, जुगार व मटका, अंमली पदार्थ,तसेच अवैधरित्या हत्यारे बाळगल्यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी गुन्हेगारांना तडीपारी, मोक्का लावत गुन्हेगारी प्रवृत्ती नाहीशी केली आहे.

कोण आहेत समीर शेख…
ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील शांती पार्क भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात समीर शेख यांचा जन्म झाला. कुटुंबातील समीर शेख हे जेष्ठ सुपुत्र. सेंट झेवियर्स शाळेत शिक्षण घेतले आहे. लहानपणापासून प्रशासकीय सेवेत जाण्याचा ध्यास लागलेल्या समीर शेख यांना खाकी वर्दीची आवड होती सन 2016 साली समीर शेख दुसर्या प्रयत्नात आयपीएस झाले व देशसेवेला सुरवात केली. प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपला प्रोबेशनरी कालावधी सन 2018 साली सातारा जिल्ह्यात सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. सातारा येथे नियुक्ती होताच आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवायला सुरुवात केली. आपल्या विशिष्ठ आणि उत्कृष्ठ कार्यशैलींने सर्वसामान्य नागरिकांची व पोलिस खात्याअंतर्गत सर्वांची मने जिंकत आपल्या कामाचा ठसा उमटविला. सातारचा कार्यकाल यशस्वीपणे पुर्ण होऊन सन 2020 मध्ये समीर शेख यांची पदोन्नतीवर गडचिरोली येथे अपर पोलिस अधीक्षक पदावर बदली करण्यात आली. गडचिरोली येथे कार्यरत असताना प्रशासन विभाग आयपीएस समीर शेख यांनी बघितला वरीष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन कर्तव्य बजावण्यासाठी समीर शेख यांची ओळख होत गेली. आयपीएस समीर शेख यांना आंतरिक सुरक्षा पदक व खडतर सेवा पदक जाहीर झाले आहे. नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा पार पाडल्याबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ‘आंतरिक सुरक्षा पदक’ दिले जाते. महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली येथे कार्यरत असताना आपल्या कर्तव्याची चुणूक समीर शेख यांनी दाखवली यामुळे शासनाने दखल घेत सन्मान केला.

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

नोव्हेंबर 2022 ते एप्रिल 2024 पर्यंत कामगिरीचा घेतलेला आढावा..
प्रतापगड मोहीम यशस्वी
10 नोव्हेंबर 2022 या दिवशी सातारा जिल्ह्यातील प्रतापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलिस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आले याचे नेतृत्व श्री.समीर शेख यांनी केले होते….

वेल डन ! सातारा पोलिस. पुसेसावळी प्रकरणात “सातारा पोलिसांनी” राखली कायदा व सुव्यवस्था.

सातारा जिल्हा पोलिस दल हे नेहमीच डोळ्यात अंजन घालून काम करत असतात हे अनेकांनी अनुभवले. पुसेसावळी (ता. खटाव) येथे उसळलेल्या दंगलीनंतर विस्कळीत झालेले जनजीवन पुर्वपदावर येत असून. पोलिस दलाने जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गांभीर्याने हाताळत,अत्यंत जलदगतीने कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करून,शांतता अबाधित राखली आहे..

सातारा जिल्ह्यातील दरोडा, जबरी चोरी,घरफोडीचे असे 271 गुन्हे उघडकीस आणून 8 कोटींहून अधिक मुद्देमाल हस्तगत केला आहे

सातारा जिल्हयामध्ये दरोडा, जबरी चोरी, घर फोडी, चोरी गुन्हे करण्याच प्रकार समोर येत सदरचे गुन्हे उघडकीस आणुन त्यातील मालमत्ता परत मिळविणेसाठी पोलिस दलाचे विशेष कसब लागत असते त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणुन त्यातील मालमत्ता हस्तगत केल्यास संबंधीत अधिकारी पोलिस अंमलदार यांना गुन्हे तपास करताना प्रोत्साहन मिळण्यासाठी 25,000/ रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले सातारा जिल्हयामध्ये एकुण 271 गुन्हे उघड करुन एकुण 8 कोटी,59 लाख 57, 455 /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये 5 किलो 850 ग्रॅम सोने व 6 किलो चांदी जप्त.

सातारा एलसीबीची टीम पूर्ण चार्ज…
समीर शेख पोलिस अधीक्षक, सातारा व आँचल दलाल अपर पोलिस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फाणें, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे अमित पाटील, पतंग पाटील या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व संपूर्ण पोलिस अंमलदार यांच्यासोबत एलसीबीने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करत या संपूर्ण कारवाई मध्ये एलसीबी चा मोठा वाटा आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा एलसीबी अग्रस्थानी आहे हे कारवाई वरून दिसून येत आहे.

एन.डी.पी.एस कारवाईला वेग…
एन.डी.पी.एसचे आता पर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 40 गुन्हे दाखल करुन त्यामध्ये 44 आरोपी अटक केली आहे. तसेच सदर कारवाईमध्ये एकूण 747. 915 किलोग्राम गांजा व 203.514 किलोग्राम अफु जप्त केला आहे तसेच सातारा जिल्हयामध्ये एन.डी.पी.एस. कारवाईचा उपक्रम प्रभावीपणे राबवून युवक वर्गाला नशेपासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न सातारा जिल्हा पोलिस दलाने केला आहे.

अवैधरित्या शस्त्रांचा वापर करणाऱ्याला पोलिसांनी दाखवला खाक्या आतापर्यंत 93 आरोपींना केली अटक.

अवैध शस्त्रे बाळगून दहशत किंवा गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
सातारा जिल्हयामध्ये एकूण 33 गुन्हे दाखल करुन त्यामध्ये 93 आरोपी अटक केली आहे. तसेच सदर कारवाईमध्ये एकूण 65 पिस्टल, 175 जिवंत काडतुस, 377 रिकामी काडतुसे जप्त केली आहे. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये अग्नीशस्त्र कारवाईचा उपक्रम प्रभावीपणे राबवून शरीराविरुध्दच्या गुन्हे कमी करण्याचे प्रयत्न सातारा जिल्हा पोलिस दलाने सातत्याने केला आहे…

सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक आयपीएस श्री.समीर शेख यांनी पदभार घेतल्यापासून जिल्हा पोलिस दलाने अवैध धंद्यावर सातत्याने कारवाई केली आहे..

अवैध जुगार केसेस
एकूण गुन्हे – 1407
एकूण आरोपी – 1503
जप्त मुद्देमाल – 2 कोटी 20 लाख 97,864/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे..

अवैध दारूबंदी केसेस
एकूण गुन्हे – 3104
एकूण आरोपी -2566
जप्त मुद्देमाल – 1 कोटी 62,लाख 97,241/-रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे

गुटखा कारवाई
एकूण गुन्हे – 68
एकूण आरोपी – 126
जप्त मुद्देमाल-3 कोटी 02,लाख 94,019/-रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाळू वाल्यांचे कंबरडे मोडले…
सातारा जिल्हयामध्ये अवैध वाळूच्या एकूण 35 केसेस करुन त्यामध्ये एकुण 55 आरोपी अटक करुन सदर कारवाईमध्ये 2 कोटी,9 लाख 10,500/- रुपयांचा रक्कमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हेगारांचे समुळ उच्चाटन…
जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचा मास्टर स्ट्रोक जिल्ह्यात आतापर्यंत 128 गुन्हेगारांवर मोक्का व 107 गुन्हेगार झाले तडीपार‌.

सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.समीर शेख यांनी पदभार घेतल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्ती नाहीशी करत गुन्हेगारांच्या नांग्या ठेचण्याचे काम शेख यांनी बजावले आहे.आजअखेर उपविभागीय पोलिस अधीकारी यांना विशेष आदेश व मार्गदर्शनाखाली एकुण 10 प्रस्ताव मंजूर करुन एकुण 128 संघटीत गुन्हेगार यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत न्यायालयामध्ये खटले चालविले आहेत. त्यामुळे संघटीत गुन्हेगारीस अटकाव करण्याचे काम चालु आहे. तसेच सातारा जिल्हयामध्ये एकुण 25 टोळयांवर तडीपारची कारवाई करुन एकूण 107 गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. व प्रतापसिंहनगरातील अतिक्रमणे हटविली, व 11 गुंडांची घरे जमीनदोस्त करून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सर्वं सामान्य जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली आहे.

जिल्हा पोलिस प्रमुखांनी लोकाभिमुख संकल्पना राबवल्या!!

स्वच्छता गड किल्ले मोहीम
दिनांक 15/01/2023 रोजी पासुन सातारा पोलिस दलामार्फत आयोजित आपले किल्ले आपली जबाबदारी मोहिमेअंतर्गत 1) अजिक्यतारा, 2) वसंतगड, 3) जरंडेश्वर, 4) वैराटगड, 5) संतोषगड, 6) दातेगड, 7) भूषणगड, 8) कल्याणगड, 9) सदाशिवगड या ठिकाणी गड मोहिम व स्वच्छता मोहिम राबविण्यात आल्या असुन मोहिमेत आज अखेर 136 पोलिस अधिकारी,721 पोलिस अंमलदार,2460 नागरीक व विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवून एकुण अंदाजे 949 किलो कचरा गोळा करुन योग्य विल्हेवाट लावण्यात आली आहे.

उंच भरारी घेवू या, उज्वल भविष्यासाठी
761 गरजू युवक व युवतींना मिळाली नोकरी.
सातारा जिल्हयामध्ये सहा.पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी सातारा म्हणून काम केले आहे. त्यावेळी असे दिसून आले की, जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात बेकारी, बेरोजगारी असुन त्यामुळे तरुणांना योग्य मार्गदर्शन संधी व साधनांअभावी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले युवक तसेच गुन्हेगारी क्षेत्राकडे आकर्षित होत असलेले अल्पवयीन मुलांची संख्या वाढत चाललेली होती. अशा युवकांना मुख्य प्रवाहात आणुन त्यांचेसाठी काही तरी करण्याची इच्छा होती. त्याप्रमाणे सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांची ही संकल्पना संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाली गोरं गरीबांना व सर्व सामान्य जनतेला पोलिस दलाने एक मोठी संधी दिली यामुळे तरुण युवक वर्गाला नोकरी पासून फिरावे लागत होते.. उंच भरारी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सातारा जिल्हयातील एकुण 761 युवक व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त इ गाला आहे. ज्यावेळी उंच भरारी योजनेतून नोकरीस लागलेले हे युवक त्यांचे आई- वडीलांसोबत कार्यालयात भेटायला येतात, त्यावेळी त्यांच्या चेह-यावरील समाधान पाहुन कृतकृत्य झाल्यासारखे वाटते हे नक्की..

स्वराज्य प्रबोधन यात्रा…
सातारा जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दीतील शाळा, कॉलेज, बस स्टॅन्ड, बाजारपेठा, लोकांचे रहदारीचे ठिकाणी चारचाकी वाहनावर एलसीडीव्दारे विविध समाज प्रबोधनपर चित्रफिती दाखवुन सर्वसामान्य जनतेमध्ये सोशन मिडीया वापर, ऑनलाईन फसवणुक, अफवांमुळे होणारे गैरसमज,सोशल माध्यमाव्दारे होणारी छळवणुक इत्यादीबाबत जागरुकता वाढविण्याचा स्वराज्य प्रबोधन अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

ग्राम सुरक्षा यंत्रणा…
या यंत्रणेव्दारे समाजामध्ये होणारे चोरी, गंभीर अपघात, आगीच्या घटना तसेच गंभीर स्वरुपाचे गुन्हे, पुर, आग, भुकंप तसेच इतर संवेदनशिल घटना स्थानिक पातळीवर नागरीकांव्दारे प्रतिबंध करणे तसेच सदर घटनांची माहिती प्रशासनास कळविणे याकरीतस सदरची यंत्रणा राबविण्यात येत आहे. या जिल्हयात एकूण 1232 गावांमध्ये सुमारे 8,73,000 पेक्षा जास्त नागरीकांचा समावेश करणेत आला असून एकूण 3471 वेळा ग्राम सुरक्षा यंत्रणेचा वापर करण्यात आलेला आहे.

दक्ष” व्हॉटसअप प्रणाली…
दिनांक 26/122023 पासून “दक्ष ” व्हॉटसअप प्रणालीमध्ये 9923,234100 ह्या क्रमांकावर नागरीकांनी त्यांचे परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती फोटोसह पाठविण्याचावत नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे. दक्ष व्हॉटसअप प्रणालीवर आलेल्या तक्रारीचे अनुषंगाने सातारा जिल्हयामध्ये एकुण 779 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याअनुशंगाने अवैध व्यवसायांवर छापे टाकुन कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामध्ये जुगार व दारुबंदी तसेच अवैध गुटखा विक्री यासारख्या अवैध धंदयांवर कारवाई करण्यात आली असुन 141 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत

संवाद तक्रारदारांशी…
सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार स्विकारला त्यावेळी जिल्हयातुन अनेक तक्रारदार त्यांच्या तक्रारी घेवुन पोलिस अधीक्षक कार्यालयात येवून त्यांच्या तक्रारी कथन करुन सांगत होते. तक्रारदारांचा ओघ मोठया प्रमाणात होता तसेच कार्यालयीन कामकाज, कायदा व सुव्यवस्था, राजकिय दौरे, आंदोलन, संप, दाखल होणारे संवेदनशील गुन्हे या मुळे तक्रारदार यांना पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये बराच वेळ वाट पाहुन ताटखळत बसावे लागत होते. त्यामुळे तक्रारदार यांचा वेळ व पैसा खर्च होत होता. या साठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.समीर शेख यांनी ही संकल्पना राबवली या संकल्पनेला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे व जनतेच्या समस्या सुटण्याचा मार्ग सुकर झाला आहे..आतापर्यंत या माध्यमातून संवाद तक्रारदारांशी या योजनेची सुरूवात जुन 2023 पासून केली असुन आतापर्यंत 7 उपविभागीय स्तरावर 3403 तक्रारदार हजर झाले असुन त्यांचे 1878 तक्रारी ची दखल पोलिस दलातर्फे घेण्यात आलेली आहे. तसेच 83 तक्रारी संबंधीत विभागास वर्ग करण्यात आल्या असून 93 अर्जामध्ये दखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत,

अद्यावत जिल्हा पोलिस दल…
सातारा जिल्हा पोलिस दल सुसज्ज होण्यासाठी सुरक्षीत व जलद प्रवास होण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सातारा यांच्याकडून 6 स्कॉर्पिओ,15 दुचाकी, 6 मिनीबस तसेच पोलिस परिवहन विभाग यांचेकडुन 27 दुचाकी, 2 मिनीबस तसेच 1 बोट अशी एकूण 57 वाहने सातारा जिल्हा पोलिस दलाचे ताफ्यामध्ये सामील करून घेतली आहेत.

पोलिस क्रिडा स्पर्धा…
कोल्हापुर परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये सातारा जिल्हा पोलिस दलाने सहभागी होवुन त्यांचे मनोबल वाढविल्याने सदर स्पर्धेमध्ये 48 सुवर्ण,38 रौप्य,32 कांस्य अशी एकुण 118 पदके पटकावून महिला व पुरुष सर्वसाधारण विजेतेपद मिळविलेले आहे.

बंदोबस्त…
भरती बंदोबस्त, निवडणुक बंदोबस्त, पालखो बंदोबस्त, मराठा मोर्चा बंदोबस्त, जातिय ताणतणाव, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त, व्हिआयपी दौरे अनुषंगाने बंदोबस्त हे सर्व बंदोबस्त खुप चांगल्या प्रकारे पार पाडून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दिलेला नाही.

नाळ माणुसकीशी ठेवणारा पोलिस अधिकारी…
आषाढी एकादशी निमित्ताने पोलिस अधीक्षक श्री.समीर शेख हे वारकऱ्यांच्या वेशात हाती टाळ घेत माऊलींचा गजर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झालं. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी वारकरी पारंपरिक वेश परिधान करून पायी वारी सोहळ्यात सपत्नीक सहभागी झाले. स्वतः हातात टाळ घेऊन व पत्नीने डोक्यावर तुळस घेऊन या सोहळ्याचा मनोभावे आनंद लुटला.

जिल्हा पोलिस प्रमुखांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा.सातारा येथे आपल्या निवासस्थानी गणपतीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून सर्व धर्म समभाव संदेश जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी दिला. समीर शेख यांनी सपत्निक गणेशाची पूजा केली. व पारंपरिक वाद्याचा निनादात पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले होते तसेच हिंदू धर्मातील सर्व सण उत्सव साजरे करताना शेख कुटुंब दिसून येत आहे.

साधी राहणी, उच्च विचारसरणी, म्हणजे समीर शेख…
नोकरी तो सब करते है, लेकिन नोकरी करणे का तरीका अलग हो, तो लोग भी आपको याद करते है, याचे मुर्तीमंत उदाहरण अशा या खाकीतल्या जिगरबाज, धाडसी, सुपरकॉप आयपीएस अधिकाऱ्याला पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.

स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!

पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

अशोक इंदलकर यांची अपर पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती!

तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस…

विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी

संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!