
हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…
पुणे : पुणे शहरात माय-लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटनाउघडकीस आली आहे. एका नवजात बालकाला जन्म देऊन आईने चक्क रस्त्यावर सोडून दिल्याचा प्रकार वडगाव बुद्रुक परिसरातील रेणुका नगरमध्ये उघडकीस आला आहे. स्थानिक व पोलिसांच्या मदतीने या बालकास रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटेननंतर स्थानिकानी नवजात बालकाबद्दल हळहळ व्यक्त करत भावना व्यक्त केल्या.
नवजात शिशुचा रडण्याचा आवाज येऊ नये म्हणून चिमुकल्या बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधण्यात आली होती. सोमवारी रात्री बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी सिंहगड पोलिसांना संपर्क केला. त्यानंतर, सिंहगड पोलिसांनी नवजात बाळाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. सध्या बालकाची तब्बेत स्थिर आहे. मात्र, चिमुकल्या बाळाला थंडीमध्ये सोडून पसार होणाऱ्या व्यक्तीबद्दल तीव्र संतापाची भावना स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी, अज्ञात व्यक्ती विरोधात सिंहगड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजात बालकाच्या पालकांचा शोध देखील सिंहगड पोलिस घेत आहेत.
दरम्यान, परिसरातील रुग्णालयात नुकतेच जन्मलेल्या बालकांची माहिती घेऊनही पोलिसांचा त्या दृष्टीने तपास सुरू आहे. मात्र, आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने समाजमन देखील हादरुन गेले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…
सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले अर्भक…
बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक…
पुणे जिल्ह्यात गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून अन् आईचाही मृत्यू…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

