पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने खेचून जबरी चोरी करणारे आरोपी व चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारांना गुन्हे शाखा युनिट-४ कडून अटक करण्यात आली आहे. शिवाय, चैन स्नॉचिंग १३ व वाहन चोरीचा ०१ असे एकूण १४ गुन्हे उघड करून १६,३०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यशोदा मेडिकल जवळ, महाराष्ट्र बॅक चौक, सांगवी येथे ०५/१२/२०२३ रोजी एक महिला व तिचा पती असे सकाळी ०६:२० वा चे दरम्यान मॅर्निंग वॉक करत असताना एका काळ्या रंगाचे प्लसर मोटारसायकल वरुन आलेल्या दोन जणांपैकी पाठी मागे बसलेल्याने महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून घेवुन गेल्याने सदर प्रकाराबाबत सांगवी पोलिस ठाणे, गु.र.नंबर- ६३१/२०२३ भा.द.वि.कलम-३९२,३४ प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदरचे प्रकार हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सदर बाबत गुन्हे शाखेस लक्ष घालून आरोपी अटक करुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.

सपोआ (गुन्हे) सतिश माने, सपोआ बाळासाहेब कोपनर यांनी तात्काळ दाखल गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवुन गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, संतोष पाटील यांना सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-४ चे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळा पासुन आरोपी गेले त्या मार्गाचे सी.सी.टी.व्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली तेव्हा अशी माहिती प्राप्त झाली की सांगवी येथील घटने नंतर काही वेळातच कासारवाडी येथे देखील एका महिलेच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावून घेवून गेले असुन दोन्ही ठिकाणा वरील आरोपी हे एकच आहे.

गुन्हे शाखा युनिट-४ सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, आणि पोहवा/मोहम्मद गौस नदाफ, पोहवा/ सुरेश जायभाये, पोशि/ सुखेदव गावंडे, पोशि/ धनाजी शिंदे, पोशि/ प्रशांत सैद, पोशि/ गोविंद चव्हाण असे स्टाफ यांनी सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करुन पोहवा/नदाफ, पोशि/गावंडे, पोशि/शिंदे यांना मिळालेल्या माहिती वरुन आरोपी नामे आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार, वय-१९ वर्षे, रा-खडकी स्मशानभुमी जवळ, रेल्वे पटरी समोर, महादेववाडी, खडकी, पुणे यास शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करुन त्याचे कडे सखोल तपास केला असता त्याने त्याचा साथिदार पाहिजे आरोपी महादेव ऊर्फ महाद्या ऊर्फ अजय गौतम थोरात (रा-खडकी) याचे सह म्हाळुंगे पोलिस ठाणे हद्दितुन मोटारसायकल चोरी करुन सदर मोटारसायकल वरुन दाखल गुन्हा व्यतिरिक्त खालील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी आनंद लोहार याचे कडे खालील गुन्हयातील चोरी गेलेल्या मुद्देमाला बाबत चौकशी केली असता त्याने आरोपी अक्षय अशोक मुरकुटे (वय-३१ वर्षे, रा-मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे) व धिरज गोपाळ गवळी (वय-३१ वर्षे, रा- घर नंबर-४२७, गवळीवाडी, खडकी, पुणे) यांचे मार्फत विल्हेवाट लावली. तसेच सदर चोरीचे दागिने घेणारे आरोपी गणपत जवाहरलाल शर्मा (वय-४४ वर्षे, धंदा-अभिषेक ज्वेलर्स रा-मांगल्य सोसायटी, एल्फिस्टन रोड, खडकी, पुणे, दर्शन रमेश पारिख, वय-३२ वर्षे, धंदा-रमेश ज्वेलर्स रा- ४०३, निता कॉर्नर, खडकी, पुणे) यांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने वरील सर्व आरोपींना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्यांचे कडुन खालील गुन्हयातील एकुण-२५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

आरोपींचा पुर्वइतिहास
आरोपीचे नाव- आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार, वय-१९ वर्षे,
रा- खडकी स्मशानभुमी जवळ, रेल्वे पटरी समोर, महादेववाडी, खडकी, पुणे
१) खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-८५/२०२१ भा.दं.वि. कलम-३९५.५०४,५०६(२)
२) खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-३७५/२०२१ भा.दं.वि.कलम-३७९
३) खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-३८०/२०२१ भा.दं.वि. कलम-३९२,५०६,३४
४) खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-३४९/२०२१ भा.दं.वि. कलम ३०७, ४(२५)
५) खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-१३९/२०२२ भा.दं.वि. कलम-३९२
६) खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-१९२/२०२२ भा.दं.वि.कलम-३७९
खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-२०६/२०२२ भा.दं.वि.कलम-३५३,३०८
८) खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-२०७/२०२२ भा.दं.वि.कलम-३७९
९) सांगवी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-२४८/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९

आरोपीचे नाव- धिरज गोपाळ गवळी, वय-३१ वर्षे, रा- घर नंबर-४२७, गवळीवाडी, खडकी, पुणे
भोसरी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-८७/२०१० भा.दं.वि.कलम-३९४.३४
२) विश्रांतवाडी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-७९/२०१६ भा.दं.वि. कलम-३८०,४११,३४
३) विश्रांतवाडी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-८३/२०१६ भा.दं.वि.कलम-३८०,४११,३४
४) मंचर पोलिस ठाणे, गु.र.नंबर-११७/२०१६ भा.दं.वि. कलम ४२०,४६५,४६७,४६८
खडकी पोलिस ठाणे, गु.र.नंबर-१०४/२०१९ भा.दं.वि. कलम ३०२,३४,४५२.१४३,१४७,१४८,१४९
पाहिजे आरोपीचे नाव महादेव ऊर्फ अजय ऊर्फ महाद्या गौतम थोरात, रा- खडकी, पुणे
१) खडकी पोलिस ठाणे गु.र.नंबर-३२/२०१६ भा.दं.वि. कलम-३९२.३४
(२) बंडगार्डन पोलिस ठाणे गु.र.नं-१३०/२१ भा.दं.वि.क-३९२,३४
३) बंडगार्डन पोलिस ठाणे गु.र.नं-१४३/२१ भा.दं.वि.क-३९५,३९७, मोक्का
४) स्वारगेट पोलिस ठाणे, गु.र.नं-१६४२/२० भा.दं.वि.क-३९२.३४

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे, सपोआ, गुन्हे सतिश माने, सपोआ बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट-४, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, पोउपनि आबासाहेब किरनाळे सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…

पिंपरी-चिंचवडमध्ये दहशतवाद विरोधी शाखेची मोठी कारवाई…

पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्टलांसह सराईत गुन्हेगारांना अटक…

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; तिघींची सुटका…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!