जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्याला अटक…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीत जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा बाळगणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट २ ने कारवाई करत अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

गुन्हे शाखा युनिट २ प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखाली ०३/११/२०२३ रोजी पोलिस अंमलदार पेट्रोलिंग करुन रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करीत होते. पोलिस हवालदार १०२३ जमीर तांबोळी व ६५८ संतोष इंगळे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी खात्रीशीर बातमी मिळाली कि, महादेवनगर चिखली येथे मुळचा उत्तरप्रदेशचा असलेला एक इसम गावठी कट्टा कमरेला लावून फिरत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलिस आयुक्त सतिश माने यांना माहिती कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अंमलदार संतोष इंगळे, जमीर तांबोळी, सागर अवसरे, नामदेव कापसे यांचे पथकाला सुचना व मार्गदर्शन करुन महादेवनगर चिखली परिसरात सापळा लावला.

पोलिस आल्याची चाहूल लागल्याने संशियत पळुन जावू लागला. पोलिस पथकाने त्याचा पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. जिशान शब्बीर खान (वय १९ वर्षे रा. रुम नंबर ३, भवानी स्टिल बिल्डींग, चिखली बसस्टॉप चिखली) असे त्याचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक गावठी कट्टा तसेच दोन जिवंत काडतुस त्याचेकडे मिळून आली. जिशान शेख हा टेम्पो चालविण्याचे काम करीत असून त्याचा गावठी कट्टा बाळगण्याचा नक्की काय उद्देश आहे याबाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली व गावठी कट्टा उत्तरप्रदेश येथून आणल्याची माहीती सांगितली. जिशान शेख याने गावठी कट्टा नक्की कोणत्या कारणासाठी व कोणाला देण्यासाठी आणला, आतापर्यंत नक्की किती अग्निशस्त्रे उत्तरप्रदेश येथुन आणली व कोणाला दिली आहेत याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे. जिशान शब्बीर खान याच्या विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे चिखली पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलिस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस अंमलदार दिलीप चौधरी, जमीर तांबोळी, संतोष इंगळे, प्रमोद वेताळ, उषा दळे, देवा राऊत, सागर अवसरे, नामदेव कापसे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत ३१ किलो गांजाचा मोठा साठा जप्त…

हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून पकडला १८ लाख रुपयांचा गुटखा…

वाकड पोलिसांनी अवैध रित्या गॅसची चोरी प्रकरणी तिघांना घेतले ताब्यात…

पिंपरीमध्ये दोघांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने चिरडले अन्…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!