
अनैतिक संबंधातून खून केल्या प्रकरणी दोन आरोपीं विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अनैतिक संबंधातून मानोली (ता. घाटंजी) येथे रुषभ उर्फ मिथुन राजू लेणगुरे (वय 28 रा. मानोली) याचा खून केल्या प्रकरणी आरोपी रुपेश पुंडलिक गुरणुले (वय 25 रा. मानोली), पुंडलिक तानबाजी गुरणुले (वय 60 रा. मानोली) या दोघां विरुद्ध अपराध क्रमांक 1042/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103, 3 (5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी दाखल केला असून, सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत हे करीत आहेत.
फिर्यादी राजू रामाजी लेणगुरे (वय 56) हा मानोली येथे कुटुंबासह राहतो व पेंटरचा व्यवसाय करतो. त्याला 2 मुले असून मोठ्या मुलाचे लग्न झाले असून तो त्याच्या पत्नी व मुलाबाळांसह वेगळा राहतो. फिर्यादी राजू व त्याची पत्नी व लहान मुलगा रूषभ उर्फ मिथुन लेनगुरे (वय 28) असे एकत्रित कुटुंबात राहते. मुलगा रूषभ हा अविवाहीत असून गवंडी काम करत होता. फिर्यादीचा मुलगा रूषभ याचे गावातील युवती (वय २२) सोबत अनैतीक संबंध होते. त्यावरून मुलगा रूषभ व रूपेश लेनगुरे यांच्यात नेहमी वाद होत होता. 22/10/2024 रोजी फिर्यादीचा मुलगा रुषभ लेनगुरे व गावातील 22 वर्षीय युवती हे दोघेही घरुन पळून गेले होते. अंदाजे 8 दिवसांपूर्वी ते दोघेही परत आले होते. युवतीची आई तिला तिचे घरी घेवुन गेली होती. दि. 04/12/2024 रोजी फिर्यादीचा मुलगा रूषभ व रूपेश गुरनुले यांच्यात अनैतिक संबधाच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी रूपेश पुंडलीक गुरनुले व त्याचे वडील पुंडलीक गुरनुले यांनी रुषभला धमकी दिली होती की, तु यांनंतर आमचे घराचे आजु बाजुला दिसला तर, तुला खतम करून टाकील. तेव्हा फिर्यादीने दोघांनाही समजावून शांत केले होते. त्यावेळी सदर वादाबाबत पोलिस पाटील यांनी सुध्दा रूपेश गुरनुले यांस समजावुन सांगीतले होते.
05/12/2024 रोजी रात्री 8/30 वा. जेवण करून फिर्यादी हा घरात झोपला होता. त्यानंतर अंदाजे रात्री 11/00 वाजताच्या दरम्यान माझ्या बाजूचा पलंग वाजल्याने मी जागा झालो. माझा मुलगा रूषभ हा पलंगावर झोपेत होता. त्यानंतर मी पुन्हा झोपी गेलो. दि. 06/12/2024 रोजी पहाटे 06 वाजता माझी मामे बहिणीने घरी येवुन सांगीतले की, तुमचा मुलगा रूषभ हा रूपेश गुरनुले याचे घरासमोर पडून आहे व त्याला मार लागलेला आहे. फिर्यादी व त्याचा मोठा मुलगा आशिष व आई कान्हुबाई लेनगुरे असे लगेच रूपेश लेनगुरे यांचे घराजवळ गेले असता, येथे फिर्यादीचा मुलगा रूषभ राजु लेनगुरे (वय 28) हा जखमी अवस्थेत पडून होता. त्याचे पायाला व तोंडाला मार लागलेला दिसत होता. फिर्यादीने गावातील पोलिस पाटील यांना माहिती देवून रुषभला अँटोमधून पोलिस स्टेशनला नेले. या वेळी घाटंजी पोलिसांनी रुषभला घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, मुलगा रूषभ उर्फ मिथुन राजु लेनगुरे (वय 28) याचे युवती सोबत असलेल्या अनैतिक संबंधाचे कारणावरून गैरअर्जदार १) रूपेश पुंडलीक गुरनुले (वय 25), 2) पुंडलीक तानबाजी गुरनुले (वय 60, रा. मानोली) यांनीच जिवानीशी ठार मारले आहे, अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून दोन्ही आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत हे करत आहेत.
पंधरा वर्षापूर्वी प्रेमविवाह अन् पत्नीने केली पतीची हत्या…
अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…
धक्कादायक! दत्तक घेतलेल्या मुलासोबतच ठेवले अनैतिक संबंध अन् पुढे…
Video: अनैतिक संबंधाच्या संशयावरून तालिबानी शिक्षा अन् मृत्यू…
धक्कादायक! नवरा म्हणायचा; मला आवडत नाहीस, तुझे अनैतिक सबंध…

