यवतमाळ बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र वरटकर यांना तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बँकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर आदीं विरुद्ध फिर्यादी तथा बॅकेचे माजी उपाध्यक्षा ॲड. मनिषा कुळकर्णी यांच्या लेखी तक्रारीवरुन अवधुतवाडी पोलिस ठाण्यात भादंवि कलम 420, 120 (ब), 468, 471, 34 अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. दरम्यान, दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर यांचा तात्पूरता अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. लउळकर यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला होता. तथापि, राजेंद्र वरटकर यांचा तात्पूरता अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी मंजूर करण्यात आला. आरोपी राजेंद्र वरटकर यांची बाजू ॲड.अजय डाखोरे यांनी न्यायालयात मांडली. अवधुतवाडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी हे पुढील तपास करीत आहे.

यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचे अवसायक, दुय्यम निबंधक व इतर आरोपींनी 10 कोटी रुपया पेक्षा अधिक रकमेचे थकीत कर्ज बुडविण्याच्या अप्रमाणित हेतूने कर्जासाठी तारण / गहाण स्थावर मालमत्तेचा कर्जमुक्त करण्याचा खोटा दस्त दुय्यम निबंधक यवतमाळ कार्यालयात संगणमताने नोंदवून थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करुन बॅक, सभासद व ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 आरोपी विरुद्ध अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले होते.

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!