
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल; पाहा जीवनप्रवास…
पुणेः पुणे शहरातील पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांना अखेर पुणे ग्रामीणचे एसपी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्रही पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे.
संदीपसिंह गिल यांची बदली 5 सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीणचे एसपी (पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक) म्हणून करण्यात आली होती. तर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची बदली मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती. मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात पंकज देशमुख यांनी मुंबईच्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (कॅट) धाव घेतली होती. त्यानंतर देशमुख यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु, आता संदीप गिल यांना आजपासून (ता. १७) पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षपदाचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबतचा आदेशही जारी करण्यात आले आहेत. तर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पुणे अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
पुणे पोलिस आयुक्त कार्यालाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात संदीपसिंह गिल्ल, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ १, पुणे शहर यांची उपरोक्त संदर्भाकित शासन आदेशान्वये पोलिस उप आयुक्त, पुणे शहर ते पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण अशी बदलीने पदस्थापना करण्यात आल्याने, त्यांना या कार्यालयाच्या आस्थापनेवरुन त्यांचे बदलीचे पदस्थापनेचे ठिकाणी हजर होण्याकरीता १७/०५/२०२५ रोजी नंतर कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
पुणे शहर पोलिस दलात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले संदीप सिंग गिल यांनी खडतर प्रवासातून यशाचे शिखर गाठले आहे. महाविद्यालयातील प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. यशाचा प्रवास करत असताना त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण, जिद्दीच्या जोरावर त्यांनी यशाला गवासणी घातली. संदीप सिंग गिल यांची प्रेरणादायी वाटचालीविषयी थोडक्यात…
संदीप सिंग गिल यांची मातृभूमी पंजाब. एका खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील जन्म. कुटुंबाची परिस्थिती जेमतेम. वडिलांचे लहानपणीच छत्र हरपलेले असल्यामुळे परिस्थितीची जाणीव लहानपणीच झाली होती. शाळेत पहिल्यापासूनच हुशार. पण, दहावी झाल्यानंतर पुढे काय? काहीच माहीत नव्हते. स्थानिक भाषेतील शिक्षणामुळे इंग्रजीचा फारसा गंध नव्हता. महाविद्यालयीन शिक्षण सुरू केल्यानंतर इंग्रजी भाषा येत नसल्यामुळे कमीपणा वाटू लागला, शिक्षकाचा शब्द मनाला लागला आणि काही करून इंग्रजी भाषा शिकायचीच, असा मनाशी चंग बांधला. पुढे अभ्यास करून जिद्दीच्या जोरावर इंग्रजी विषयाचे ते प्राध्यापक झाले….
अधिक माहितीसाठी पुस्तक खरेदी करा…
पुस्तक Online खरेदी कराः
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?
पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…
खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

