धक्कादायक! मेहुणीला सोबत घेऊन गेला अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक दाजी मेहुणीला आपल्यासोबत दिल्लीला घेऊन गेला होता. मात्र, आता मेहुणीचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. दाजी अंकितने मेहुणीचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेत नेला आणि तिच्या घराबाहेर ठेवून तिथून पळ काढला. मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन आरोपी दाजीवर खुनाचा आरोप केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिलीप कुमारने अयोध्या जिल्ह्यातील बीकापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सहजपूर गावात आपली मुलगी नीतू हिचं लग्न केले होते. सुमारे 15 दिवसांपूर्वी नीतूचा दीर अंकित भावाच्या सासरच्या घरी पोहोचला आणि वहिनीच्या प्रसुतीच्या बहाण्यानेनमेहुणी दिव्यांशु (वय २२) हिला घेऊन दिल्लीला गेला. 5 जुलै रोजी वडील दिलीप यांना दिव्यांशु हिचा मृत्यू झाल्याची माहिती समजली.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
वडिलांनी अंकितला फोन केला असता अंकितने सांगितलं की, 4 जुलै रोजी दिव्यांशुने गळफास लावून आत्महत्या केली होती. रात्री उशिरा अंकितने दिव्यांशुचा मृतदेह दिल्लीहून खासगी रुग्णवाहिकेतून आणला आणि मृतदेह घराबाहेर ठेवून तेथून पळ काढला. मृत युवतीचे काका जीत बहादूर यांनी आरोप केला आहे, की मोठ्या मुलीचा दीर अंकितने दिव्यांशुला नोकरीसाठी दिल्लीला नेले आणि तिची हत्या केली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी खाजगी रुग्णवाहिकेतून मृतदेह घरी पोहोचवला. यानंतर मृतदेह घराबाहेर ठेवून घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी मुंशीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत युवतीची बहीणने सांगितले की, दिराने खोटं बोलून तिला दिल्लीला नेले, विष पाजलं आणि गळफास लावून तिची हत्या केली. माझ्या आईलाही खोटं बोलून घटनास्थळी बोलावून घेतले आणि नंतर बहिणीची हत्या झाल्याचं समजले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…
दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…
प्रेमापोटी मेव्हणीला दिला महागडा मोबाईल गिफ्ट अन् पुढे…
जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…
मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…