
सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…
सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील विवाहित महिलेने प्रेमासाठी प्रियकराचा मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा थरारक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांचे अनेक खुलासे समोर आल्यानंतर आता या खून प्रकरणाचं गुढ उकलले आहे. आरोपी निशांत सावंत याने मतिमंद महिलेला पंढरपूर मधून आणून तिचा गळा दाबून खून केला. नंतर पडक्या घरात दोन दिवस महिलेचा मृतदेह लपवून ठेवला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेला 11 जुलै रोजी निशांत याने दुचाकीवरून पंढरपूर येथे आणल्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. संबंधित महिला पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. महिलेचा फोटो दाखवून नातेवाईकांना ओळख पटवणे शक्य होईल.
किरण सावंत (वय २३) हिचे चुलत दीर निशांत सावंत (वय २०) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. अनैतिक संबंधाचा कुटुंबाला याचा सुगावा लागू नये म्हणून त्यांनी एक विचित्र योजना आखली. ती म्हणजे किरणने आत्महत्या केल्याचा बनाव उभा करायचा आणि प्रत्यक्षात कोणीतरी अनोळखी महिलेचा खून करून तिचा मृतदेह जाळायचा. या योजनेनुसार, निशांतने पंढरपूरमधून एका मतिमंद महिलेला दुचाकीवरून आणले. त्या महिलेला एका पडक्या घरात नेऊन तिने तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह दोन दिवस तिथेच लपवून ठेवला. नंतर चादरीत गुंडाळून तो मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजीत टाकून पेटवून दिला. यावेळी खून लपवण्यासाठी किरणने आत्महत्या केली, असा बनाव रचला. पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्येचा संशय घेतला, पण तपास सुरू केल्यावर सत्य हळूहळू समोर येऊ लागले. पोलिसांनी किरण आणि निशांत यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यातून त्यांचे संबंध स्पष्ट झाले.
निशांत सावंत याने 11 जुलै रोजी दुचाकीवरून पंढरपूरहून एका महिलेचा अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यानंतर त्याने दोन हजार रुपये देऊन डिझेल घेतलं आणि मंगळवेढ्यातून नवीन गॅस सिलिंडर व शेगडी विकत घेतली. मृतदेह जाळण्यासाठी याचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जळालेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गावागावांत चौकशी सुरू केली. अखेर त्या महिलेबाबतची माहिती समोर आली असून ती पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर गावातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. या क्रूर घटनेमुळे पाटकळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकर दिराने महिलेला जाळण्याआधी काय-काय केलं? पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड…
प्रेम! फिल्मी स्टाईल मृत्यूची थरारक घटना पोलिसांनी केली उघड…
पत्नीला जाळल्याचा संशयावरून पतीला अटक; पण प्रियकरासोबत सापडली ‘जिवंत’…
साखरपुडा पार पडल्यानंतर घरी निघालेल्या युवतीचे रस्त्यातच अपहरण…
मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…
सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…

