धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…
पुणे: पुणे जिल्ह्यातील एका शाळेत 12 वर्षांच्या मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना दोन दिवसांपूर्वी शाळेच्या आवारातील बाथरूममध्ये घडली होती. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. 12 वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप असून त्याला बाल न्याय मंडळाकडे पाठवण्यात आले आहे. हे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीसमोर मांडण्यात आलं आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी 12 वर्षीय मुलाविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांनुसार बलात्कार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.