रील्स स्टार अथर्व सुदामे याला नोटीस; पाहा रिल्समधील संवाद…

पुणे : पीएमपीकडून पूर्वपरवानगी न घेता, पीएमपीच्या बसमध्ये रील्स तयार करून, त्यामध्ये महामंडळाचा गणवेश, ई-तिकीट मशिन आणि बॅच बिल्ल्याचा बेकायदेशीर वापर केल्याप्रकरणी रील्स स्टार अथर्व सुदामे याला पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नोटीस बजावली आहे.

पीएमपी प्रशासनाच्या माहितीनुसार, अथर्व सुदामे याने पीएमपी बसमध्ये वाहकाचा गणवेश परिधान करून, ई-तिकीट मशिन हातात घेऊन रील्स तयार केले. संबंधित रील्समध्ये एक महिला आणि एक पुरुष असून, महिलांविषयी आशय असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या रील्समुळे महामंडळाची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. संबंधित रील तत्काळ इन्स्टाग्रामवरून हटवावी, तसेच या प्रकरणी सात दिवसांच्या आत सक्षम प्राधिकाऱ्यांकडे लेखी खुलासा सादर करावा, असे नोटिसीत स्पष्ट करण्यात आले आहे, अन्यथा संबंधिताविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

अथर्व सुदामेचा रिल्समधील संवाद पुढीलप्रमाणे…
अथर्व – बोला तिकीट बोला
महिला – दीड द्या!
अथर्व – दीड महिला – माझा फुल, यांचं हाल्फ!
अथर्व – यांचं हाल्फ तिकीट.
महिला – हो कारण ते हाल्फ मॅड आहेत ना?
अथर्व – नाही मॅडम तरी पण तुम्हाला दोनच तिकीट घ्यावी लागतील.
महिला – का बरं? अथर्व – तुम्ही दीडशहाणे आहात ना…!

प्रसिद्ध अभिनेत्रीने मालिकेतील पात्राप्रमाणेच उचललं मोठं पाऊल…

पुणे! नवले पूल अपघतात अभिनेत्याचा मृत्यू! चिमुकला झाला पोरका…

Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!