RPF आरोपीचा अजब दावा; रेल्वेमधील हत्याकांडाचा घटनाक्रम…

मुंबई : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (ता. 31) गोळीबाराची घटना घडली. आरपीएफ शिपायाने गोळीबारात आपलाच सहकारी आणि तीन प्रवाशांचा जीव घेतला. या प्रकरणी आरोपीला आरपीएफ शिपायाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीएफ शिपाई अमेय घनश्याम आचार्य (वय 26) यांनी आपल्या जबाबात ट्रेनमध्ये पहाटे घडलेला घटनाक्रम कथन केला.

आरपीएफ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यासोबत तब्येतीच्या कारणावरुन झालेल्या वादानंतर आरोपी चेतन सिंह याने रागाच्या भरात गोळीबार केल्याचे अमेय आचार्य यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी चेतन सिंह हा मुंबई-जयपूर ट्रेनमधून खाली उतरला. तेव्हा त्याठिकाणी कर्तव्यावर असेले दोन आरपीएफचे जवान प्रवीण कुमार तमांग आणि जयप्रकाश यादव यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्यांच्यावर देखील बंदूक रोखली आणि त्यांना बाजूला जाण्यास सांगितले. तुम्ही जर गेला नाहीत तर मी तुमच्यावर देखील फायरिंग करेल असे त्याने त्यांना म्हटले. त्यानंतर ते बाजूला होताच चेतन सिंह याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र काही अतंर चालत गेल्यावर त्याला समोरून लोकल ट्रेन येताना दिसली. त्यानंतर त्याने आपल्या जवळची बंदूक रेल्वे रुळावर फेकून पळण्यास सुरुवात केली. तो पळत असतानाच त्याच्या समोरून येणाऱ्या जीआरपीचे दोन जवान आणि आरपीएफच्या दोन जवानांनी त्याला पकडले.

आरोपी चेतन सिंह याला पकडण्यात आल्यानंतर त्याला बोरीवली रेल्वे पोलिस चौकीत आणण्यात आले. पकडण्यात आल्यानंतर चौकशीदरम्यान चेतन सिंह याने अजब दावा केला आहे. माझे वडील माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनीच मला सांगितले की, यांना मारून टाक असा विचित्र दावा आरोपीने केला आहे.

फिर्यादी अमेय आचार्य हे त्या रात्री आरोपी चेतन सिंहसोबत मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये ड्युटी करत होते. आपली तब्येत बिघडली असून आपल्याला वलसाड येथे उतरु द्यावे, असे आरोपी चेतन सिंह हा ASI टिकाराम मीणा यांना सांगत होता, असे आचार्य यांनी आपल्या जबाबात सांगितले. ASI टिकाराम मीणा, इन्स्पेक्टर हरिश्चंद्र यांनी कंट्रोल रुमशी संपर्क साधला असता तिथल्या अधिकाऱ्यांनी ASC (असिस्टंट सिक्युरिटी कमिशनर) सुजित कुमार पांडे या सर्वांनी चेतन सिंहला समजवायचा प्रयत्न केला की दोन-तीन तासांची ड्युटी बाकी आहे. गाडी मुंबईला पोहोचेपर्यंत आराम करुन तिथे जाऊन औषधोपचार कर उपचार करावेत. पण चेतन सिंह ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

अमेय आचार्य यांनी चेतन सिंहला B/4 या बोगीमध्ये नेले. तिथे जाऊन एका रिकाम्या सीटवर झोपवले आणि त्याची रायफल घेऊन बाजूच्या सीटवर बसून होते. पंरतु चेतन सिंह जास्त वेळ झोपला नाही. 10 ते 15 मिनिटांनी तो उठला आणि रायफल घेऊन निघाला. चेतन सिंह हा ASI टिकाराम मीणा यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी वाद घालत होता. ते त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तो त्यांचे ऐकत नव्हता. यानंतर मात्र चेतनने आपल्या रायफलची सेफ्टी कॅच हटवला. तो फायरिंग करण्याच्या मनस्थितीत होता. हे सर्व सुरु असताना फिर्यादी आचार्य हे तिथून निघून पॅन्ट्रीमध्ये गेले.

आपण पॅन्ट्री कारमध्ये असताना 05.25 वाजता कॉन्स्टेबल कुलदीप राठोड यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की ASI टिकाराम मीणा यांच्यावर गोळीबार झाला आहे. आचार्य हे B/5 कोचच्या दिशेने जात असताना त्यांनी पहिले की चेतन सिंगच्या हातात रायफल होती आणि रायफल ट्रेनच्या दिशेने ताणलेली असून तो अधूनमधून गोळीबार करत होता. काहीवेळात कोणीतरी चैन ओढली आणि चेतन सिंह हा खाली उतरुन ट्रॅकवरुन चालत मिरारोड रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात होता. त्याच्या हातात रायफल तशीच होती, असे आचार्य यांनी जबाबात म्हटले आहे.

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…

जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!