
धक्कादायक Video! मुरबाडमध्ये वायरमनचा मृत्यू CCTV मध्ये झाला कैद…
ठाणे : मुरबाडमध्ये एका वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कमलाकर भोईर (वय ५३) असे मृत्युमुखी पडलेल्या वायरमनचे नाव असून, ते रस्त्यावरची वीज सुरू करण्यासाठी खांबावर चढले होते. यावेळी त्यांना शॉक लागून मृत्यू झाला आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
मुरबाड नगरपंचायतमध्ये वायरमन कमलाकर भोईर हे कार्यरत होते. याच नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या खांबावरील बंद पडलेली लाईट चालू करण्यासाठी ते चढले होते. मात्र, यावेळी बंद केलेला वीज प्रवाह अचानक चालू झाला. कमलाकर भोईर यांना वीजेचा जोरदार शॉक लागला. यानंतर काही क्षणातच ते खांबावरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
धक्कादायक! मुरबाडमध्ये वायरमनचा एका क्षणात मृत्यू…https://t.co/42LUDp7gg7 pic.twitter.com/4sEpoTjqii
— policekaka News (@policekaka) July 24, 2024
कमलाकर भोईर यांच्या मृत्यूची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, कमलाकर भोईर विजेच्या खांबावर चढले आहेत. अचानकच ते क्षणभरात खाली कोसळतात आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यानंतर आसपास असणारे लोक धावत त्यांच्या मदतीसाठी येतात. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे एका वायरमनचा बळी गेला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसकाका Video News: २४ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
ह्रदयद्रावक! महाविद्यालयीन युवतीच्या अंगावर झाड कोसळल्याने मृत्यू…
पोलिस पाटलाने ग्रामपंचायतीमध्येच घेतला गळफास; व्हिडीओ म्हटले की…
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…