पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…
पुणेः पुणे-बंगळुरु महामार्गावर बुधवारी (ता. १३) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पुणे-बंगळुरु महामार्गावरील खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भीषण अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर पुण्याला जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. परंतु, पोलिसांनी काही वेळातच ती सुरळीत केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, महामार्गांवर अपघात घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विविध अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो तर काहीजण गंभीर जखमी होतात. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवताना किंवा पायी चालताना सतर्क राहण्याची आणि नियम पाळण्याची आवश्यकता आहे.
भाविकांच्या बसला भीषण अपघात; ११ जागीच ठार; अनेकांना चिरडले…
बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…
शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…
Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…
लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…