Video: आंध्र प्रदेश रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला…

विजयवाडा (आंध्र प्रदेश): विजयनगर जिल्ह्यात रविवारी (ता. २९) सायंकाळी दोन ट्रेनची समोरासमोर धडक होऊन झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या १३ वर पोहोचली असून ३२ जण जखमी झाले आहेत. विशाखापट्टणम पलासा पॅसेंजर ट्रेन आणि विशाखापट्टणम रायगढा पॅसेंजर ट्रेन एकमेकींना धडकल्या आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाला घटनेची माहिती देऊन बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी एम्ब्युलन्स आणि मदतीसाठी रेल्वेगाड्या दाखल झाल्या. दरम्यान, रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली असून २२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत तर १८ ट्रेनचे मार्ग बदलेले आहेत.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ज्या ट्रेनने मागून धडक दिली तिच्या चालकाने सिग्नल चुकवला होता. चालकाने लाल सिग्नल पार केला आणि मागून धडक दिली. पुढे जात असलेली लोकल ट्रेन खूपच कमी वेगात धावत होती. हावडा चेन्नई मार्गावर विजयनगर जिल्ह्यात रेल्वे दुर्घटना घडली. ही दुर्घटना मानवी चूक आणि सिग्नलकडे दुर्लक्ष या कारणामुळे झाल्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोन रेल्वेंची धडक ज्या ठिकाणी झाली तिथला ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रेल्वेचे काही डबे रुळावरून बाजूला गेल्याचे दिसत आहे. दोन ते तीन डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच डब्यातील प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त रेल्वेचे डबे रुळावरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…

लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…

Video: लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग; नऊ प्रवाशांचा मृत्यू तर…

रेल्वेचा पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!