पुणे शहरात माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या विरोधात प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणेः फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडून बेकायदेशीर माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या रविंद्र ससाणे व त्याचे इतर ०२ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १३ वी कारवाई आहे.

हनुमान फिनिक्स मॉल येथे फिर्यादी यांच्या कामगारांना ट्रक मधील माल खाली करुन न देता खंडणी मागून, मॉल मध्ये व्यवसाय करु देणार नाही, अशी धमकी दिल्याने १) रविंद्र जयप्रकाश ससाणे, वय ४९ वर्षे, रा. कल्लापुरे कॉलनी, खुळेवाडी, मंदीर शेजारी, विमाननगर, (टोळी प्रमुख)
२) मंगल रमेश सातपुते वय अंदाजे ४० वर्षे, रा. धानोरी विश्रांतवाडी पुणे
३) दिपक संपत गायकवाड वय ४० वर्षे, सर्व रा. मुळा रोड, खडकी येरवडा, पुणे यांचे विरुध्द तक्रार दिल्याने विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ७७/२०२३
भा.दं.वि. कलम ३८५, ५०६, ३४ अन्वये वरील नमुद आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील गुन्ह्याचे तपासादरम्यान आरोपी रविंद्र जयप्रकाश ससाणे (वय ५० वर्षे रा. खुळेवाडी हनुमान मंदिराजवळ चंदननगर, टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०२ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाकदपटशहा दाखवुन, जुलुम जबरदस्तीकरुन, जबरी चोरी करणे, सरकारी नोकरावर हल्ले करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, खंडणी मागणे, गंभीर गुन्हे करणे अशा प्रकारचे गुन्हे करुन सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली होती. नमुद आरोपी विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केलेले आहेत. त्याचे वर्तनात सुधारणा झालेली दिसत नाही.

आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे बेकायदेशिरपणे आर्थिक फायदया करीता सदरचा गुन्हा केल्याचे दिसून आल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करणेकामी मंजुरी मिळणे करीता विमानतळ पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी पोलिस उप आयुक्त परीमंडळ ०४ पुणे शहर शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पणे शहर रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करून वरील आरोपी विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४), प्रमाणे चा अंतर्भाव करणेची अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा यांनी मंजुरी दिलेली आहे व नमुद आरोपींविरुध्द मोक्का कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्याची मान्यता दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा पोलिस आयुक्त किशोर जाधव हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त शशिकांत बोराटे, सहा पोलिस आयुक्त किशोर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमानतळ पोलिस स्टेशन, पुणे शहर विलास सोंडे पोलिस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, पोलिस उप निरीक्षक एस. एस. कोळ्ळुरे व सर्व्हेलन्स पथकातील पोलिस अंमलदार उमेश धेंडे, सचिन जाधव, चंदन तोडेकर, वाघुले, महिला पोलिस अंमलदार भोर यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १३ वी कारवाई आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!