दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…

भोपाळ (मध्य प्रदेश) : एका व्यक्तीने कुत्र्याला मारण्यापासून रोखल्याने पत्नी आणि मुलांवर तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची घटना बडनगरमध्ये घडली आहे. यानंतर त्याने स्वत:चा गळाही कापला. काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला आहे. दिलीप पवार असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनगर तालुक्यातील बालोदा गावात ही घटना घडली आहे. दिलीप पवार हा शनिवारी (ता. १९) रात्री दारूच्या नशेत घरी पोहोचला होता. एक कुत्रा त्याच्यावर भुंकत होता. कुत्रा आपल्यावर भुंकत असल्याचा राग दारुड्याला आला. त्याने पळत घरी जात तलवार आणून कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिलीपची पत्नी गंगाबाई हिने त्याला मुक्या प्राण्याला मारण्यापासून रोखले. यानंतर तर दिलीपला जास्तच राग आला. त्याने पत्नी गंगाबाईवर तलवारीने वार केले, यात गंगाबाईचा जागीच मृत्यू झाला. तिची मुलगी नेहा (वय 17) आणि मुलगा योगेंद्र (वय 14) हे आईवरील हल्ला थांबवण्यासाठी पुढे आले असता दिलीपने दोघांवर तलवारीने वार केले.

दिलीप याला मुलगा देवेंद्र आणि मुलगी बुलबुललाही मारायचे होते. मात्र, दोन्ही मुलांनी छतावरून उडी मारून पळ काढला. अन्यथा त्यांनाही या घटनेत जीव गमवावा लागला असता. त्यानंतर दिलीपने तलवारीने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. जीव वाचवून घरातून पळून गेलेल्या मुलांनी गावातील नागरिकांना या हत्याकांडाची माहिती दिली, त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी दिलीप, गंगाबाई, योगेश आणि नेहा यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…

बापरे! हसला म्हणून कोयत्याने मनगटापासून दोन्ही हाथ छाटले…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!