पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा…

पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला तनिषा भिसे यांना उपचार नाकारल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील नागरिकांनी आंदोलन करताना संताप व्यक्त केला आहे. दीनानाथ रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर प्रचंड टीका होत होती. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही रद्द व्हावे, अशी मागणी जोर धरत होती. याच पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातून दबाव वाढल्यानंतर डॉ. सुश्रुत घैसास यांनी दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सोपवला आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. सुश्रुत घैसास सेवा करीत होते. मात्र, तनिषा भिसे प्रकरणात उपचार करण्यास नकार दिल्याचा प्रमुख आरोप त्यांच्यावरच ठेवण्यात आला होता. तनिषा भिसे यांचे उपचार डॉ. घैसास यांच्याकडेच सुरू होते. मात्र, प्रसूतीवेळी १० लाखांची मागणी करून उपचारास नकार दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. या आरोपावरून संतापलेल्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. घैसास यांच्या आई-वडिलांच्या रुग्णालयाची देखील तोडफोड केली होती. या सगळ्या प्रकरामुळे डॉ. घैसास व्यथित होते.

हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामी आणि रुग्णांची होणारी गैरसोय पाहता डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. घैसास यांनी आपला राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केला आहे. डॉ. घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी अमानत रक्कमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र दुसऱ्या बाजूला आहेत तेवढे पैसे भरून उपचार सुरू करू, असे रुग्णाला आणि त्यांच्या नातेवाईकांना सूचना केल्याची बाजू संपूर्ण वादानंतर डॉ. घैसास यांनी मांडली आहे.

भाजप आमदार अमित गोरखे यांनी डॉ. घैसास यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. तिन्ही समित्यांच्या अहवाल आल्यानंतर मी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तनिषा भिसे यांचा मृत्यू नसून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

मोठी बातमी! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटबाबत घेतला मोठा निर्णय…

पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयााबाबत मोठी माहिती समोर…

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अखेर नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले…

दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती मृत्यू प्रकरणी दिले स्पष्टीकरण…

पुणे! गर्भवतीच्या उपचारासाठी रग्णालयाने मागितले 10 लाख, महिलेचा मृत्यू…

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

खाजगी रुग्णालयात गेलेल्या महिलेचा तासाभरातच मृत्यू…

ससूनचा कारभार! दिशा भोईटे प्रकरण अद्याप संपलेले नाही…

दिशा भोईटे हिचा वैद्यकीय खून समजावा का?

मुलाच्या मृत्यूनंतर तब्बल 11 दिवस ठेवले व्हेंटिलेटरवर; सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!