Paris Olympic 2024 : पॅरिसमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेवर सामूहिक बलात्कार…

पॅरीस (फ्रान्स) : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 26 जुलैपासून ऑलिम्पिकला सुरुवात झाली आहे. जगभरातील खेळाडू पॅरिसमध्ये दाखल झाले आहेत. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. पण ऑलिम्पिकच्या सुरुवातीआधीच म्हणजेच 20 जुलै रोजी मध्यरात्री पॅरिसमध्ये एका ऑस्ट्रेलियन महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे,

ऑस्ट्रेलियन महिलेवर सामूहिक बलात्काराची ही घटना 20 जुलै रोजी घडली होती. मध्यरात्री या महिलेवर काही जणांनी हल्ला केला आणि त्यानंतर तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. फ्रेंच तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेनंतरचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ही 25 वर्षीय महिला लोकांकडे मदत मागताना दिसत आहे.

पीडित महिलेने कबाबच्या दुकानात आश्रय घेऊन आपला जीव वाचवला. हे दुकान पॅरिसच्या 18व्या अरेंडिसमेंटमध्ये बुलेवार्ड डी क्लिचीमध्ये मॉलिन रूजच्या जवळ आहे. पॅरिस ऑलिम्पिकमुळे संपूर्ण फ्रान्स हाय अलर्टवर आहे. याचदरम्यान समोर आलेल्या या धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पॅरिसच्या महापौरांनी खेळाडूंना एकटे बाहेर न जाण्याचा सल्ला दिला आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी फ्रान्सने 60 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे. मात्र, असे असतानाही त्या ठिकाणी ऑलिम्पिकआधी एका परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलिसकाका Video News: २७ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

संतापजनक! सामूहिक बलात्कारातील पीडित मुलीवर पुन्हा बलात्कार अन्…

धक्कादायक! महाराष्ट्रातील चिमुकलीवर पंरप्रांतीय व्यक्तीने केला बलात्कार…

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

संतापजनक! मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी युवतीवर केला बलात्कार अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!