
सिंहगडरोड पोलिसांनी वाहनं चोरणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात मौजे करीता दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीच्या सिंहगडरोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
सिंहगडरोड पोलिस स्टेशन हाद्दीत रेकॉर्डवरील आरोपी तसेच संशयीत इसम व गुन्हयाना आळा घालण्यासाठी आणि वाहनचोरी, घरफोडी, अवैध धंदे यांना प्रतिबंधक होणे कामी खाजगी वाहनावर पेट्रोलिंग डयुटी सुरू होती. वडगाव ब्रिजचे खाली पोलिस अंमलदार आबा उत्तेकर, राजु वेगरे, यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत १९/१० वा. बातमी मिळाली की, गिरीजा हॉटेलचे बाजूस असणाऱ्या बसस्टॉप जवळुन अंदाजे २० ते २५ वर्षाचे, अंगाने सडपातळ असलेल्या इसमाने दोन दिवसापुर्वी पारे कंपनी चौक येथील हिंदुस्थान पाईप या ठिकाणाच्या समोरील रोडवर पार्क केली तीन चाकी रिक्षा चोरी केली होती तो स्वामी नारायण मंदीराच्या समोरील सर्व्हिस रोडवर थांबलेला आहे.
पोलिसांना खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदर बातमी सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली असता ती त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी सदर बातमीची खातर जमा करुन योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्टाफसह स्वामी नारायण मंदीर नन्हे पुणे येथे जावुन खात्री केली असता बातमीतील वर्णनाचा इसम हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसल्याने व तो सिंहगड रोड पोलिस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील वाहन चोर असुन त्याची व आमची नजरानजर होताच तो पोलिसांना पाहून सदर ठिकाणीहून पळून जावू लागल्याने स्टाफच्या मदतीने त्यास काही अंतरावर २०/०१/२०२४ रोजी २०/४५ वा चे सुमारास पकडले. प्रथमेश ऊर्फ बाब्या अनिल हजारे (वय – ३० वर्षे रा. धनगरवस्ती पाण्याचे टाकीजवळ नांदेडफाटा सिंहगड रोड पुणे) असे त्याने नाव सांगितले. आरोपीकडे अधिक तपास करता त्यांने सिंहगड रोड पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजि नं ३९/२०२४ भा दं वि कलम ३७९, २. सिंहगड रोड पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ४१/२०२४ भादं वि कलम ३७९ ३. सिंहगड रोड पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं ६२४/२०२३ भा दं वि कलम ३७९ हे केले असून त्याने चोरी केलेली दुचाकी वाहने त्यांच्याकडुन जप्त केली आहेत. तसेच त्याच्याकडुन वळसंग पोलिस स्टेशन सोलापुर (सोलापुर ग्रामीण) गुन्हा रजि नं २०/२०२४ भादंवि कलम ३७९ हे गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीचे एक तीनचाकी रिक्षा व तीन मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असुन पुढील अधिक तपास सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम, सिंहगड रोड पोलिस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संभाजी कदम, पोलिस उप-आयुक्त परीमंडळ -३, पुणे शहर आप्पासाहेब शेवाळे, सहा पोलिस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर अभय महाजन, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर, जयंत राजुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उप निरीक्षक गणेश मोकाशी, पोलिस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, देवा चव्हाण, विकास बांदल, विकास पांडुळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, अमोल पाटील, अविनाश कोंडे, दक्ष पाटील यांचे पथकाने केली.
सिंहगड रोड पोलिसांनी कोम्बींग ऑपरेशन दरम्यान एकाला पकडले अन्…
सिंहगड रोड पोलिसांनी दिवसा घरफोडी करणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईतास युनिट ६ गुन्हे शाखेने केले जेरबंद…
निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…
पुणे पोलिस! साडेतीन वर्षांनतर उलगडले महिलेच्या खुनाचे रहस्य…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

