ह्रदयद्रावक! बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा जागीच मृत्यू…

नागपूर : नागपूर शहराच्या मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तन्वी भिवणकर हिचा एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या अपघाताच जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारे तिचे वडील सुभाष भिवणकर यांचाही घटनास्थळी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तन्वी आणि तिचे वडिल दुचाकीवरुन जात असताना भरधावपणे विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात वडिल आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर वंशिका नरुळे ही युवती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अपघाताच्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून मारहाण केली. तसेच, ट्रकच्या केबिनला आग लावून घटनास्थळी दगडफेकही करण्यात आली. या दगडफेकीत पोलिस वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, ट्रकचालक प्रफुल भोयरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उमरेड पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्षिकेची हृदयद्रावक सुसाईड नोट; तीन महिन्यांच्या चिमुकलीने मुखाग्नी द्यावा अन्…

हृदयद्रावक! एक नवविवाहित तर दुसऱ्या बहिणाचा विवाहापूर्वी अपघाती मृत्यू…

हृदयद्रावक! पत्नीला वाढदिवशीच समजली प्राध्यापक पतीच्या मृत्यूची बातमी…

हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!