आयएएस-आयपीएस अधिकारी न झाल्याची खंत; निरीक्षकाची आत्महत्या…

नागपूर: अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. भम सिद्धार्थ कांबळे (वय 25, वर्मानगर, गंगाखेड, परभणी) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागातील निरीक्षक भम कांबळे यांनी आत्महत्या केली आहे. एका हॉटेलच्या खोलीत या अधिकाऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

भम कांबळे हे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवाशी असून, ते मित्राला भेटायला नागपूरला आले होते. त्यानंतर एका हॉटेलच्या खोलीत त्यांनी स्वतः तयार केलेले विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आएएएस किंवा आयपीएस न झाल्याची खंत सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवली आहे.

पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…

हिंजवडी येथील कंपनीमध्ये काम करणाऱ्या युवकाची आत्महत्या…

हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…

विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…

वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!