हृदयद्रावक! दिवाळीच्या दिवशी स्वयंचलित दार झाले लॉक; व्यापाऱ्यासह तिघांचा जळून मृत्यू…

कानपूर (उत्तर प्रदेश): कानपूरमध्ये दिवाळीच्या दिवशी आलिशान घरातील देवघरात लावलेल्या दिव्यामुळे घराला आग लागली. या घटनेत व्यापारी, पती-पत्नीसह मोलकरीण होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संजय श्याम दासानी (48), पत्नी कनिका दासानी (42) आणि मोलकरीण छवी चौहान (24) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

दिवाळीनिमित्त घरात पूजा केल्यानंतर व्यापारी पती-पत्नी दिवे लावल्यानंतर झोपले होते. देवघरातील एका दिव्याला आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. स्वयंचलित दार लॉक झाल्यामुळे पती-पत्नी बेडरूममधून बाहेर पडू शकले नाहीत. दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचाही मृत्यू झाला. व्यापाऱ्याचा मुलगा पार्टीवरून परतला तेव्हा त्याला घरातून धूर निघताना दिसला. त्याने आरडाओरड करून जवळच्या लोकांना बोलावले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथकही पोहोचले. आग आटोक्यात आल्यानंतर पती, पत्नी आणि मोलकरणीला बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले.

कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय श्याम दासानी यांची अंबाजी फूड्स नावाची कंपनी असून बिस्किटांचाही कारखाना आहे. व्यापारी संजय श्याम दासानी हे पत्नी, मुलगा आणि मोलकरणीसह पांडू नगरमधील तीन मजली घरात राहत होते. गुरुवारी रात्री त्यांनी पत्नीसह दिवाळी पूजन करून जेवण केल्यानंतर खोलीत झोपायला गेले होते. मोलकरीणही तिच्या खोलीत जाऊन झोपली. देवघरातील दिव्यातून रात्री उशिरा आग लागली. दोघांना वाचवण्यासाठी मोलकरीण खोलीत गेली. आगीमुळे तिघांचाही मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी व्यावसायिकाचा मुलगा हर्ष घरी उपस्थित नव्हता, असे कुटुंबीयांनी सांगितले. दिवाळीनिमित्त तो मित्रांसोबत पार्टीला गेला होता. रात्री उशिरा परतले असता घरातून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी आसपासच्या लोकांना आणि पोलिसांना याची माहिती दिली.

हृदयद्रावक! तायक्वांदो खेळाडूचे डोकं छाटलं; आईने डोकं हातात घेऊन केला आक्रोश….

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…

हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…

हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!