
धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…
मुंबई : मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली (वय २५) नावाच्या वैमानिक युवतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
सृष्टी ही विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती. मात्र, तिने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला आहे. 25 नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातून माहिती मिळाल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सृष्टीने अंधेरी परिसरात राहत असलेल्या तिच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. अंधेरी पोलिसांना सकाळी 8 वाजताच्या सुमारास याबाबत माहिती मिळाली, त्यानंतर पार्थिव घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते.
पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी सांगितले की, मृत युवती ही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत होती. पोलिसांनी याबाबत केलेला तपास आणि नातेवाईकांचे जबाब नोंदवले असता सृष्टीचा तिच्या मित्रासोबत वाद झाला होता, दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. त्यातूनच ती त्रस्त होती, म्हणून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर, पोलिसांनी सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यास अटक केली आहे.’
दरम्यान, आदित्य पंडित (वय २७) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याबाबतचा पुढील तपास करत आहेत.
Video: भारतीय हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोसळले, दोन पायलटचा मृत्यू…
हृदयद्रावक! दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या…
पोलिस अधिकाऱ्याच्या एकुलत्या एका मुलाची आत्महत्या; मी जीवनाचा आनंद घेतला आहे…
प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल…
धक्कादायक! सोलापूरमध्ये महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या…

