Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…
मुंबईः पत्नीला धक्का लागल्याने रागाच्या भरात दाम्पत्याने एका युवकाला मारहाण केली. या मारहाणीत युवक रेल्वे मार्गावर पडल्याने रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनेश राठोड (रा. घणसोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अविनाश माने आणि शीतल अविनाश माने या दाम्पत्याला अटक केली असून, पोलिस तपास करत आहेत.
माने दांपत्य शिव रेल्वे स्थानकात जिन्यावरून उतरत होते. यावेळी प्रवासी दिनेश राठोड याचा धक्का शीतल माने यांना लागला. यानंतर बाचाबाची झाली आणि हा प्रकार वाढतच गेला. महिलेने प्रवाशाला छत्रीने मारले. अविनाश यांनी देखील त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या झटापटीत दिनेश राठोडचा तोल गेल्याने तो रुळांवर पडला. यावेळी लोकलच्या धडकेत त्या युवकाचा मृत्यू झाला आहे. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता.
मारहाणीनंतर रेल्वे अपघात मृत्यू झालेला दिनेश राठोड हा बेस्टमध्ये कामाला होता. अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलिस सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे. याबाबत दादर रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून अविनाश व शीतल दोघांनाही अटक केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे मृत युवकाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याठिकाणी लाखो लोक रोज प्रवास करतात. यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. यामुळे अनेकदा अशा प्रकारच्या धक्कादायक घटना घडत असतात. यातूनच ही घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…
भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…
जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…