Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…
पाटणा (बिहार): सीआरपीएफ जवानाने आपल्या पोलिस कॉन्स्टेबल असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले आहे. रेल्वे स्टेशनवर प्रियकराला मारहाण करण्यात आली. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना रेल्वे स्टेशनवर पकडले. जवानाने प्लॅटफॉर्मवर उपस्थित जमावासमोरच प्रियकराला बेदम मारहाण केली. बिहार पोलिसात कॉन्स्टेबल असलेली महिला सीआरपीएफ जवान असलेल्या आपल्या पतीची फसवणूक करत प्रियकरासह पळून जात होती, तेवढ्यात तिच्या पतीने तिला पकडले. सीआरपीएफ जवान पत्नीच्या शोधात स्थानकावर पोहोचताच महिलेने नवऱ्याला पाहिले आणि प्रियकरापासून अंतर राखण्यास सुरुवात केली आणि प्रियकरानेही घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
जवानाने दोघांना एकत्र पाहून त्या व्यक्तीला रेल्वेस्थानकावर पकडून ठेवले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. इतर प्रवाशांनी मध्यस्थी करून भांडण थांबवण्याऐवजी त्यांनी ही घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. स्थानकावर प्रियकराला मारहाण केल्यानंतर सीआरपीएफ जवान त्याच्या पत्नीसोबत जोरदार वाद घालत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. काही काळ स्थानकावर हायव्होल्टेज ड्रामा सुरू राहिला आणि नंतर सीआरपीएफ जवान आपल्या पत्नीसह निघून गेला. हे जोडपे गेल्यानंतर त्या व्यक्तीनेही घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केल्याचे वृत्त नाही. पण, संबंधित घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.
पटना जंक्शन पर पति-पत्नी और आशिक के बीच लड़ाई:CRPF में है पति, बिहार पुलिस में पत्नी, प्रेमी के साथ ट्रेन पकड़ने पहुंची लेडी कांस्टेबल#Bihar #BiharNews #Patna pic.twitter.com/dxogIfrpVb
— FirstBiharJharkhand (@firstbiharnews) October 31, 2024
वडिलांना अचानक जाग आली अन् पाहिले तर मुलगी प्रियकराच्या मिठीत…
खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस…
Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…
Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…
पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…
धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…