
गणेरी व मानोली येथे अवैध रेतीचा ट्रक व ट्रॅक्टर महसुल विभागाने पकडला..
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी 19 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री मौजा गणेरी येथे विनापरवाना अवैध रेती वाहतुक करणारा MH27 X 5380 क्रमांकाचाचा एक ट्रक अवैध रेती वाहतूक करतांना महसुल विभागाने ताब्यात घेतला.
सदर ट्रक पुढील कारवाई साठी पारवा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला. सदर कारवाई मंडळ अधिकारी पि.आर. कांबळे, तलाठी डी. एम. किनाके, तलाठी आर. जी. राठोड, तलाठी रामेश्वर कुमरे या वेळी उपस्थित होते.
घाटंजी चे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी दुपारी महसुल नायब तहसीलदार अरुण भिसे यांनी मौजा मानोली येथे विनापरवाना अवैध रेती वाहतुक करणारे तीन ट्रॅक्टर अवैध रेती वाहतूक करतांना ताब्यात घेतले. तसेच पुढील कारवाई साठी घाटंजी पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आले.
सदर कारवाई मंडळ अधिकारी आर. जी. शिंदे, येरकार, तलाठी नवीन खोब्रागडे, अतुल खोब्रागडे, पि. बि. कार, प्रतिक कनाके, पोलिस पाटील शाम वाढई आदींनी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस दलात खळबळ! लाचखोर एपीआय, पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल…
धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
परभणी हिंसाचार! तीन पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश…