भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून पळवून नेत तिच्यावर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना जौनपूर जिल्ह्याच्या मच्छली शहराच्या रसूलाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

एका अल्पवयीन मुलीला तिच्या घरातून सहा जणांनी पळवून नेत तिच्यावर ऑन कॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित मुलीने आरडाओरड करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेतली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये चार पुरुष अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करताना दिसत आहे. तर पीडित मुलगी स्वत:चा बचाव करत आहे. तरीही आरोपी जबरदस्ती करत तिच्या अंगाशी झटत आहेत. पीडितेनं आरोपींचा प्रतिकार केला असता आरोपींनी तिचे हात मुरडत तिच्यावर शारीरिक हल्ला केला.

पीडित मुलीने जोरजोरात आरडाओरडा करत आरोपींच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी एक आरोपी ही संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद करत होता. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, पीडित मुलीचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोक मदतीला धावून येतील या भीतीने सहाही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रसूलाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून, घटनेचा पुढील तपास केला जात आहे. ही घटना १४ ऑगस्ट रोजी रात्री घडली आहे, याबाबतची माहिती पोलिसांनी दिली.

प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…

धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…

धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!