धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): चिमुकल्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या बापावर गुंडांनी समोरुन गोळ्या घातल्या आणि बाप जागेवरच कोसळला तर चिमुकली जमिनीवर जोरात पडली. संबंधीत घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना शाहजहांपूरमध्ये घडली आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले होते. हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाहजहांपूरमधील बाबूजी परिसरात मोहम्मद शोएब हा युवक आपल्या लेकीला खांद्यावर घेऊन बाजारात जात होता. याचवेळी दोन युवक दुचाकीवरुन त्याच्या पुढे काही अंतरावर थांबले. समोरून येणाऱ्या एका युवकाने मोहम्मद शोएबवर अगदी जवळून गोळी झाडली. यानंतर युवक जागेवरच कोसळला तर चिमुकली जमीनीवर पडली. गोळी झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवर बसून फरार झाला होता. एक महिला किंचाळत शोएबच्या दिशेने धावत जात असताना व्हिडिओत दिसत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शोएबचे लग्नावरुन एका कुटुंबाशी वाद सुरु होता. त्यानंतर त्याने दिल्लीतल्या दुसऱ्या एका मुलीशी लग्न केले होते. शोएबचे सुरुवातीला लग्न ठरले होते. पण काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाले होते. जखमी मोहम्मद शोएबला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
उत्तरप्रदेश: शाहजहांपुर में कंधे पर बेटी को बैठाकर ले रहे शोएब को सरेराह गोली मार दी गई.
तारिक समेत 3 पर FIR, 2 आरोपी गिरफ्तार. #UttarPradesh #Firing #Murder #ViralVideos #shahjahanpur pic.twitter.com/z242OnJSUZ
— Sanjay ᗪєsai (@sanjay_desai_26) August 15, 2023
प्रेमविवाह! पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच बसला धक्का…
हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…
क्रूरतेचा कळस! चिमुकल्यांसोबत आरोपींनी केले भयानक राक्षसी कृत्य…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…