उपसरपंच गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड प्रकरणात नवा ट्विस्ट…

बीड : लुखामसला (ता. गेवराई) गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी बार्शीत कारमध्ये बसून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी असलेल्या प्रेमसंबंधातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पूजा गायकवाडला अटक केली आहे. ती सध्या पोलिस कोठडीत असून तिची पोलिस कोठडी आज संपणार असून, तिला आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची आर्थिक लूट केली होती. तिने बार्शी परिसरात बर्गे यांच्या पैशांतून पावणे दोन गुंठे जमीन घेतल्याची माहिती समोर आली होती. या जमीन खरेदीखतावर साक्षीदार म्हणून पूजाच्या भावाने सही केल्याचे देखील समोर आले आहे. आता पूजाने आणखी तीन एकर जमीन बर्गे यांच्या पैशांतून खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी पूजाला अटक केल्यानंतर पूजाच्या आणि तिच्या जवळच्या व्यक्तींच्या नावावर असलेल्या संपत्तीबाबत माहिती काढली होती. दरम्यान, तिच्या मावशीच्या नावावर काही दिवसांपूर्वी वैराग परिसरातील तीन एकर जमीन खरेदी केल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली आहे. पूजा गायकवाड ही लहानपणापासून आपल्या मावशीकडे राहायला होती. मावशीनेच पूजाला मोठं केले आहे. त्यामुळे मावशीसाठी पूजाने गोविंद बर्गेंची आर्थिक लूट केली का? असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

मावशीच्या नावावर असलेल्या तीन एकर जमीनीसाठी गोविंद बर्गे यांनी खरंच पैसे दिले होते का? दिले असतील तर ती रक्कम कशी दिली? ऑनलाईन ट्रान्झेक्शन केलं का? याबाबतचे बँकेचे तपशील पोलिसांकडून तपासले जात आहेत. पोलिसांनी या जमिनीच्या मूळ मालकाला बोलवून त्याचीही चौकशी केली आहे. नर्तिका पूजा गायकवाड हिला आज दुपारनंतर बार्शी न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यानंतर पूजाच्या पोलिस कोठडीत वाढ होणार की तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार? हे आज स्पष्ट होणार आहे. बार्शी पोलिस पुढील तपास करत आहेत.

नर्तकी पूजा हिने माजी उपसरपंच गोविंद बर्गे अन् तिच्या नात्याविषयी सांगितले…

सोलापूरमध्ये नर्तिकेवरून गोळीबार; तू मला काय भुरटा समजतो काय…

उपसरपंच मृत्यू प्रकरणातील नर्तिका पूजाचा जुना Video व्हायरल; मेरे पास चार…

उपसरपंच अंखड बुडाला होता नर्तिकेच्या प्रेमात; कसा झाला शेवट पाहा…

प्रेमात वेडा! बार्शीत नर्तिकेच्या घरासमोर माजी उपसरपंचाने केली आत्महत्या; कारण…

प्रेयसीसोबत लॉजवर नवऱ्याला रंगेहाथ पकडलं; घाबरून मारली उडी…

दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!