जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…

मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये पालघरजवळ एका आरपीएफ जवानाने आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास अधिकाऱ्यासह ३ प्रवाशांवर गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपी चेतन या जवानाला बोरिवली पोलिसांनी अटक केली असून, तपासादरम्यान गोळीबाराचे कारण समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर एएसआय टीकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधोपूरचे रहिवासी होते. त्यांची पोस्टींग आरपीएफ गुजरातला झाली होती. फायरिंग करणारा आरोपी जवान हादेखील गुजरातमध्येच पोस्टिंगला होता. या दोघांना एस्कॉर्ट ड्युटीला तैनात केले होते. आरोपी चेतनने सर्व्हिस बंदुकीने त्यांच्यावर हल्ला केला. जयपूर-मुंबई एक्सप्रेसच्या बी ५ या कोचमध्ये ही फायरिंग झाली. ही घटना आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. गोळीबारामध्ये ४ जणांचा गोळी मृत्यू झाला आहे.

या घटनेतील आरोपी आरपीएफ जवान चेतन हा मानसिक तणावाखाली असल्याचे समोर आले आहे. आरपीएफ जवान आणि त्याचे सिनिअर अधिकारी यांच्यात काही कारणास्तव वाद झाला होता. ज्यानंतर रागाच्या भरात कॉन्स्टेबलने गोळीबार सुरू केला. त्यानंतर ट्रेनची साखळी ओढून आरोपी चेतनने दहिसरजवळ ट्रेनमधून उडी मारली. त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले. मुंबईच्या बोरिवली पोलिसांच्या पथकाने कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. सध्या त्याची चौकशी केली जात आहे.

आरोपी जवानाने त्याच्या मित्राला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, आता मी नोकरीला थकलो आहे. VRS घेऊन निवृत्त होण्याचा त्याचा मानस होता. काही वर्षांपूर्वी सूरत RPF मध्ये पोस्टिंगवेळी ट्रेनमध्ये काही टोळक्यांनी टिकाराम यांना चाकू मारला होता. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले आणि त्यातून ते बचावले होते. टिकाराम हे ट्रेनमध्ये एस्कॉर्टमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलला तो झोपू देत नव्हते. रात्रीच्या ड्युटीवर झोपलेल्या कॉन्स्टेबल चेतनला त्यांनी रोखले असावे, असा संशय आहे. त्यामुळे तो अस्वस्थ झाला. वैयक्तिक वैरही नाकारता येत नाही. मात्र चेतनने इतर प्रवाशांना गोळ्या का मारल्या? हा देखील मोठा प्रश्न आहे. त्याला ट्रेनमध्ये पकडले जाण्याची भीती होती का? या प्रश्नाचा शोध घेत आहे. मृत आरपीएफ एएसआय टिकाराम मीणा यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू…

पोलिसकाका विजय चौधरी यांनी भारताला मिळवून दिले सुवर्णपदक…

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!