अमरावतीमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला वाळूच्या ट्रकने चिरडलं…

अमरावती: अमरावती शहरातील बियाणी चौकात ट्रक चालकाने महिला पोलिस अधिकाऱ्याला चिरडले असून, त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

अमरावती शहरातील बियाणी चौकात रेतीचा ट्रक व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात सहाय्यक पोलिस अधिकारी प्रियंका कोटावार यांचा डावा पाय निकामी झाला आहे. अपघात इतका भयानक होता की पायाचा चुरा झाला आहे. घटनेनंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिला पोलिस अधिकारी प्रिंयका कोतावार या आपल्या कर्तव्यावर राजापेठ पोलिस ठाण्यात जात असताना हा अपघात झाला आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी प्रियंका बोरकर (वय 26, रा. शेगाव, अमरावती) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या ग्रामीण मुख्यालयी नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. सर्व पोलिस ठाण्यातून नोंद गुन्ह्याची माहिती घेतल्यावर ड्युटी आटोपून त्या घरी निघाल्या होत्या. पहाटेच्या सुमारास पती सागर रमेश शिरसाट (वय 31) यांच्यासह दुचाकीने घरी जात होत्या. मार्गात संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रियंका ह्या गंभीर जखमी झाल्या. पती सागर सिरसाट यांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान प्रियंका यांचा मृत्यू झाला. प्रियंका बोरकर या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. या घटनेने पोलिस दलात हळहळ व्यक्त करण्यात आली होती.

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…

पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!