Live Video: बसमध्ये चढताना पाकीट कसे मारले जाते पाहा…

चेन्नई (तमिळनाडू) : एका बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पाकीट चोरले आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

काही चोर एवढे हुशार असतात की ते अशा पद्धतीने चोरी करतात ते कळतही नाही. पाकीटमारीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बसच्या गर्दीत त्याने संधी साधत चाकू, कात्रीशिवायच एका प्रवाशाचे पाकीट चोरले आहे. पुरुष सहसा त्यांचे पाकीट पँटच्या मागच्या खिशात ठेवता. पण हा खिसा असा असतो की त्यातून सहजासहजी पाकीट बाहेर येऊ शकत नाही. ते कुणी काढत असले तरी पटकन समजते. पण काही चोर एवढे हुशार असतात की तुम्हाला तुमचं पाकीट कुणी चोरत असेल तर समजणारच नाही. आता ते कसं ते तुम्ही या व्हिडीओत पाहा.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एका बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी आहे. गर्दीत एका व्यक्तीने त्याच्या पुढे असलेल्या तरुणाच्या मागच्या खिशात हात टाकला आहे. बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या युवकालाही त्याची माहिती नाही. व्यक्ती त्या युवकाच्या खिशातून हात काही काढत नाही. गर्दीत कुणाच्याही ते लक्षात येत नाही. युवक बसमध्ये चढतो तशी ती व्यक्ती त्याच्या खिशातून पाकिटासह आपला हात बाहेर काढते आणि धक्का लागल्यासारखे मागे सरकते.’ दरम्यान, संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

Video: ऑफिसमधील दृश्य कैद पाहून घाबरण्याची शक्यता…

Video: कपिल देव यांचे तोंड आणि हात बांधून घेऊन जात आहेत…

Video : गणपतीच्या मंडपात नाचताना युवकाचा मृत्यू झाला कॅमेरात कैद…

Video: व्यापाऱ्याला बेदम मारहाण अन् नग्न करून काढली धिंड…

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!