कुख्यात गुंड भूषण लोंढे 34 फुटांवरून उडी मारूनही अडकला नाशिक पोलिसांच्या जाळ्यात…

नाशिकः सातपूर आयटीआय सिग्नल येथील ऑरा बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर फरार झालेला पीएल ग्रुपचा म्होरक्या भूषण लोंढे अखेर नाशिक पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. लोंढेसह त्याचा साथीदार प्रिन्स सिंग याला देखील उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेवरून ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने सातपूरच्या गोळीबार प्रकरणानंतर आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी माहिती मिळताच उत्तर प्रदेशातील बडौत आणि कोटपुतली (राजस्थान) याठिकाणी शोध कार्य सुरु केले. पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या प्रयत्नात भूषण लोंढेने 34 फुटांवरून उडी मारली. यात त्याच्या दोन्ही पायांना फॅक्चर झाले आहे.

गुन्हे शाखेच्या तपासात, सुपोनि हेमंत तोडकर, पो.नि. डॉ. समाधान हिरे आणि पोहवा प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याचा मागोवा घेतला. त्यानंतर पथकाला राजस्थानातून उत्तर प्रदेशातील महाराजगंजकडे पाठवण्यात आले. अखेर भूषण प्रकाश लोंढे (वय ३५, रा. स्वारबाबानगर, सातपूर, नाशिक) आणि प्रिन्स चित्रसेन सिंग (वय ३६, रा. जगताप मळा, सिडको, नाशिक) या दोघांना ताब्यात घेण्यात यश आले आहे.

भूषण लोंढेवर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर भारतीय दंड संहिता, फौजदारी सुधारणा कायदा, हत्यारे कायदा, मकोका आणि मोका यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. सातपूरचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढेला आधीच या प्रकरणात सहआरोपी केले गेले आहे. दोघेही सध्या नाशिकरोड कारागृहात आहेत. शहर पोलिसांनी लोंढे टोळीवर मकोका अन्वये कारवाई करत, पीएल ग्रुपशी संबंधित अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. भूषण लोंढे आणि त्याचा टोळीवर कारवाई ही नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधात पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले…

नाशिक! अंबड पोलीस ठाण्याने वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा केला उघड…

नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…

नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!