मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत…

पुणे (संदीप कद्रे): मुंढवा पोलिसांनी तब्बल १० वाहनचोरी करणारा अल्पवयीन मुलास केशवनगर येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातून एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुददेमाल हस्तगत केला आहे. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस उपआयुक्त परीमंडळ ०५ पुणे शहर आर राजा यांनी परीमंडळ ०५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करणेबाबत विशेष मोहीम राबविणेबाबत पोलिस ठाणेस मिटिंग घेवुन आदेश दिले होते. सदर आदेशावरुनच मुंढवा पोलिस ठाणे गुर नं ३७४/२३ भादवी ३७९, ३४ मधिल चोरीस गेलेल्या हीरो होंडा आय स्मार्ट गाडीचा शोध घेणेबाबत मुंढवा पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी मुंढवा पोलिस ठाणे तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक श्री संदीप जोरे व तपास पथक स्टाफ यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या.

मुंढवा तपास पथक अधिकारी व स्टाफ मुंढवा पोलिस ठाणे हददीत गस्त करीत होते. मुंढवा तपास पथकातील अंमलदार पोहवा ७३२ दिनेश राणे यांना यापुर्वी वाहन चोरीच्या गुन्हयातील पकडलेला अल्पवयीन दुचाकीवर जात असताना दिसला. त्यास थांबवुन सदर वाहनाबाबत विचारपुस केली असता त्याने समर्पक उत्तर न दिल्याने सदर बाबत पोलिस ठाणे अभिलेख पडताळुन पाहीले असता मुंढवा पोलिस ठाणे गुर नं ३७४/२३ भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असलेबाबत माहिती मिळाली. सदरचे वाहन त्यानेच चोरल्याबाबतची खात्री झालेने त्या अल्पवयीन कडे त्याचे पालकासमक्ष अधिक चौकशी केली असता त्याने हडपसर, मुंढवा व लोणीकाळभोर येथुन एकुण १० दुचाकी वाहने चोरी केलेचे तपासात निष्पन्न झालेने सदरची वाहने जप्त करण्यात आली आहेत व हडपसर उपविभागातील एकुण वाहन चोरीचे १० गुन्हे उघड करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले असुन एकुण २,७५,०००/-रुचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वाहन क्रमांक
एमव्हीए ३२९७
एमएच१२एफवाय४७६३
एमएच१२एनआर ९६२७
एमएच १२ पीपी ६८७७
एमएच १२ व्हीजे ७८१३
एमएच १२ बीके ६५६४
एमएच १३ ईए १५२२
एमएच१३सी झेड ४५०६
एमएच १२जीक्यु ८०००
एमएच१२ डीजे७८७३

नमुद प्रमाणे वाहनचोरीचे १० गुन्हे उघड करण्यात आले आहेत. सदरची कामगीरी पोलिस आयुक्त रितेशकुमार, रामनाथ पोकळे, अति कार्यभार सह पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, आर राजा, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्रीमती अश्विनी राख, सहा. पोलिस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे पुणे, संगिता रोकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलिस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक संदिप जोरे, पोहवा ७३२ जोरे, पोहवा ७३२ दिनेश राणे, पोहवा ४१७२ संतोष काळे पोहवा ५४१८ संतोष जगताप, पोहवा दिनेश भांदुर्गे, पोहवा राहुल मोरे पोशी ४४४१ स्वप्नील रासकर पोशी सचिन पाटील यांनी केली आहे.

मुंढवा परिसरात सावकारांच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या…

मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…

पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!