पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ची धडाकेबाज कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथका १ ने धडाकेबाज कारवाई केली असून, सराईत वाहन चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वरिष्ठांच्या आदेशान्वये पो उप निरी शेख, पो.हवा येडे, पो.हवा राठोड ,पो हवा ढगे, पो.ना. लोखंडे हे ३०/०१/२०२४ रोजी वाहन चोरी प्रतिबंधक चे अनुषंगाने पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गस्त करीत होते. गस्ती दरम्यान स्टाफ मधील पोना रविंद्र लोखंडे व पो.हवा. आजिनाथ येडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराने बातमी दिली की, एकाकडे हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल असून सदरची मोटर सायकल ही चोरीची आहे. सदरचा इसम हा कात्रज तलावच्या जवळ उभा आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बाबत मा. वपोनी सो कळविले असता त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सदर ठिकाणी जाऊन विकास उध्दव माने (वय ३६ रा.मु.पो. माडज ता.उमरगा जिल्हा. धाराशिव सध्या रा.गल्ली नं ३ एस.बी. आय बँकेचे शेजारी, गोकुळनगर कात्रज पुणे) यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकल बाबत व कागदपत्रांबाबत चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने व कागदपत्रे दाखवल्याने तसेच सदर मो/सा च्या मुळ मालकाचा शोध घेणे असल्याने त्यास सी.आर. पी. सी. कलम ४१(१)(ड) अन्वये ताब्यात घेऊन अटक करुन अटक मुदतीत त्याचेकडून खालील नमूद पो स्टे कडील वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१) भारती विद्यापीठ पो स्टे, गु र नं. ९३/२०२४, भा. दं. वि. कलम ३७९
२) डेक्कन पो स्टे, गु र नं. १६८/२०२३,भा. दं. वि. कलम ३७९
३) डेक्कन पो स्टे, गु र नं. १४/२०२४, भा. दं. वि. कलम ३७९
एकूण ०३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून किं. रू. ३५,०००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्यास पुढील कारवाई करिता भारती विद्यापीठ पो.स्टे. यांचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी हा पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहनचोरीचे गुन्हे अभिलेखा वरील असून सदर आरोपीवर यापूर्वी विश्रामबाग,डेक्कन,हडपसर पो.स्टे.असे एकूण १८ वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही रामनाथ पोकळे, अपर पो. आयुक्त सो, गुन्हे, पुणे शहर, अमोल झेंडे, पो उप आयुक्त सो, गुन्हे, पुणे शहर, सुनील तांबे, सहा पोलिस आयुक्त सो, गुन्हे १, पुणे शहर व विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी शाहिद शेख, पोना रवींद्र लोखंडे, पो.हवा. आजिनाथ येडे, पो हवा. गणेश ढगे पो.हवा.प्रदीप राठोड ,पो. शि नारायण बनकर यांनी कारवाई केली.

पुणे शहरात दरोडाच्या तयारीत असलेल्या टोळीस युनिट ५ने केले जेरबंद…

पुणे शहरात वाहन चोरी करणाऱ्या सराईतास युनिट ६ गुन्हे शाखेने केले जेरबंद…

पुणे पोलिस आयुक्तपदाचा अमितेश कुमार यांनी स्विकारला पदभार…

गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीचा जीवाला धोका असल्याचा दावा; कोणापासून पाहा…

पुणे शहरात शिक्षकाकडून विद्यार्थीनीला ‘I Love You’ चा मेसेज अन्…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!