भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात एक भरधाव ट्रक रिक्षावर उलटल्याने रिक्षाचालकासह चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली आहे. या अपघातामध्ये अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संगीता चाहांदे (वय 56, रा. गडचिरोली), अनुष्का खेरकर (वय 22, रा. बल्लारपूर), प्रभाकर लोहे आणि रिक्षा चालक इरफान खान (वय 49, रा. बाबूपेठ) अशी मृतांची नावे आहेत. चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर हा अपघात झाला आहे. अष्टभुजा मंदिराजवळील रेल्वे उड्डाणपुलावरुन एक ट्रक (एम एच 34 एम 1817) भरधाव वेगात येत होता. वेगामुळे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं आणि तो शेजारुन जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर (एम एच 34 एम 8064) उलटला. ट्रकखाली चिरडले गेल्याने रिक्षातील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.

भीषण अपघातामध्ये राजकला मोहूर्ले (वय 34 , रा. बाबूपेठ), गीता शेंडे (वय 50. रा. तुकुम, दशरथ बोबडे (वय 50, रा. वणी) हे जखमी झाले असून, एकाची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमी प्रवाशांना उपाचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच मजुरांना चिरडले…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!